काँग्रेसने संविधानाचा कधीच आदर केला नाही, अकोल्यात पीएम मोदींनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले
Prime Minister Narendra Modi News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील अकोला येथे सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी विरोधी पक्ष आणि त्यांच्या नेत्यांवर अनेक गंभीर आरोप केले. तसेच काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांना बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान, न्यायालय आणि देशाच्या भावनेची चिंता नाही, असे मोदी म्हणाले. व महाराष्ट्राचे आशीर्वाद सदैव भाजपच्या पाठीशी आहे असे देखील पंतप्रधान म्हणालेत.
तसेच गेल्या दहा वर्षांत महाराष्ट्राने भाजपला मनापासून आशीर्वाद दिल्याचेही पंतप्रधान मोदी म्हणाले. या आशीर्वादामुळेच महाराष्ट्रात भाजपला भक्कम पाठिंबा मिळाला आहे. पंतप्रधानांनी महाराष्ट्रातील लोकांची देशभक्ती, आणि दूरदृष्टीचे कौतुक केले.
पंतप्रधान मोदींनी 9 नोव्हेंबर तारीख ऐतिहासिक असल्याचे वर्णन केले. ते म्हणाले की या दिवशी म्हणजे 2019 मध्ये भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिराबाबत निर्णय दिला होता. या निर्णयानंतर सर्व धर्माच्या लोकांनी संवेदनशीलता आणि बंधुभावाचा आदर्श घालून दिला.
तसेच मोदी पुढे म्हणाले की, विदर्भाचे आशीर्वाद त्यांच्यासाठी नेहमीच खास राहिले आहे. विधानसभा निवडणुकीत त्यांनी पुन्हा महायुतीसाठी आशीर्वाद मागितले. पंतप्रधानांनी लोकांना सांगितले की, जर कोणी कुटूंब झोपडी किंवा कच्चा घरात राहत असेल तर त्यांची माहिती द्यावी. पंतप्रधानांनी प्रत्येकाला कायमस्वरूपी घरे देऊ असे आश्वासन दिले.
Edited By- Dhanashri Naik