शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. विधानसभा निवडणूक 2024
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
Written By
Last Modified: सोमवार, 23 सप्टेंबर 2024 (09:05 IST)

उद्धव यांच्या पत्नी रश्मी ठाकरेच महाराष्ट्राच्या भावी मुख्यमंत्री होणार! बॅनर झळकले

rashmi thachkeray
social media
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखा अद्याप जाहीर झाल्या नाही. निवडणुका वर्षाच्या अखेरीस होण्याची शक्यता वर्तवण्यास येत आहे. मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या निवास स्थानी मातोश्री येथे महाराष्ट्राच्या भावी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या नावाचे बॅनर लावण्यात आले आहे. 

या बॅनर नंतर राज्यात राजकीय खळबळ उडाली असून तासाभराच्या आतच हे बॅनर काढण्यात आले. 
महाराष्ट्रात नुकतेच महिला मुख्यमंत्रीपदाची चर्चा सुरु झाली आहे.आज सोमवारी रश्मी ठाकरे यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने मातोश्री येथे शिवसेना युवा सेनेने रश्मी ठाकरे भावी मुख्यमंत्री असल्याचे बॅनर झळकावले.   
बॅनर लावल्यानन्तर काही तासांनीच पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी तातडीनं बॅनर काढून घेतले  

येत्या काही महिन्यांत महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होणार आहेत. महाविकास आघाडी आणि महायुती दलाच्या नेत्यांनीही आपापल्या स्तरावर निवडणूक सभा आणि जाहीर सभा घेण्यास सुरुवात केली आहे. 
Edited By - Priya Dixit