रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. विधानसभा निवडणूक 2024
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
Written By
Last Updated : मंगळवार, 19 नोव्हेंबर 2024 (14:46 IST)

मतदानासाठी ‘हे’ 12 प्रकारचे ओळखपत्र पुरावे मान्य

विधानसभा निवडणूक उद्या 20 नोव्हेंबर रोजी होणार असून 23 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे.राज्यातील सर्व मतदान केंद्रांवर बुधवारी 20 नोव्हेंबर सकाळी 7 ते सायंकाळी 6 यावेळी मतदान होणार आहे. मतदारांना आवाहन आहे की, मतदार ओळखपत्रासह आणखी एक ओळखपत्र (Voter ID) घेऊन मतदानासाठी केंद्रावर जावे.

मतदानाला जाताना आपला मोबाईल घरीच ठेवावा. जास्तीत जास्त मतदारांनी मतदानासाठी घराबाहेर पडावे. मतदान साठी पात्र मतदाताचे नाव मतदार यादीत नाव असल्यास मतदारांच्या छायाचित्र ओळख पत्रां व्यतिरिक्त इतर 12 प्रकारचे पुरावे भारत निवडणूक आयोगाने मान्य केले आहे.

या 12 ओळखपत्रांव्यतिरिक्त कोणताही एक ओळख पात्र दाखवल्यावर मतदारदाता मतदान करू शकणार. सजी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातून देण्यात आली आहे. 

भारत निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी ज्या मतदारांकडे छायाचित्रासह मतदार ओळखपत्र आहे, ते मतदार मतदान केंद्रावर त्यांची ओळख दाखवून मतदान करू शकणार आणि ज्यांच्या कडे वोटर आयडी नाही ते या 12 ओळखपत्रांपैकी कोणतेही एक पुरावे सादर करू शकतील. 
आधार कार्ड
मनरेगा अंतर्गत निर्गमित करण्यात आलेले रोजगार ओळखपत्र
बैंक किंवा टपाल विभागातर्फे छायाचित्रासह वितरित करण्यात आलेले पासबुक
कामगार मंत्रालयाद्वारा वितरित आरोग्य विमा स्मार्ट कार्ड
 ड्रायव्हिंग लायसन्स,
पॅन कार्ड
राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अंतर्गत भारतीय महानिबंधक आणि जनगणना आयुक्तांनी जारी केलेले स्मार्ट कार्ड
 पासपोर्ट
निवृत्तीवेतनाचा दस्तऐवज
केंद्र अथवा राज्य शासन, तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वितरित केलेले छायाचित्र ओळखपत्र
संसद, विधानसभा, विधानपरिषदेच्या सदस्यांना वितरित केलेले अधिकृत ओळखपत्र
भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तिकरण मंत्रालयाच्यावतीने दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेले विशेष ओळखपत्र
हे पुरावे मतदानासाठी मान्य केले गेले आहे. तर अनिवासी भारतीयांना त्यांची ओळख पटविण्यासाठी त्यांचा मूळ पासपोर्ट असणे आवश्यक आहे. 
Edited By - Priya Dixit