शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. विधानसभा निवडणूक 2024
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
Written By
Last Updated : शनिवार, 31 ऑगस्ट 2024 (11:11 IST)

कोण आहे जितेश अंतापूरकर? विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये दाखल

Jitesh Raosaheb Antapurkar
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्रातील देगलूर येथील काँग्रेसचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी गुरुवारी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देऊन शुक्रवारीच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
 
जितेश आणि इतर काँग्रेस आमदारांची काँग्रेस चौकशी करत असतांना आमदार जितेश यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. तसेच आमदार अंतापूरकर यांच्यासह विधानपरिषद आणि राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसच्या काही आमदारांनी क्रॉस व्होटिंग केले आहे. तसेच भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर जितेश अंतापूरकर म्हणाले की, काँग्रेसमधील अनेक नेते नाराज असून काँग्रेसमधील किती जण भाजपमध्ये प्रवेश करतात हे लवकरच समोर येईल.
 
कोण आहे जितेश अंतापूरकर? 
जितेश अंतापूरकर यांनी 2019 ची विधानसभा निवडणूक देगलूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटवर जिंकली होती. आपल्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत त्यांनी काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहून आपल्या मतदारसंघाच्या विकासावर लक्ष केंद्रित केले होते. तसेच आवश्यक सुविधा, शिक्षण, आरोग्य सेवा आणि समाजकल्याण या मुद्द्यांना त्यांनी महत्व दिले आणि त्यांच्या मतदारसंघातील लोकांशी जवळचा संवाद ठेवला.
 
तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत आपले भविष्य सुरक्षित करण्यासाठी अंतापूरकर यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून तिकीट न मिळण्याच्या चिंतेने त्यांनी हा राजीनामा दिला आहे. कारण जितेश अंतापूरकर क्रॉस व्होटिंगमध्ये असल्याचा काँग्रेस पक्षाला संशय होता, त्यामुळे काँग्रेसने आगामी विधानसभा निवडणुकीत जितेश यांना तिकीट न देण्याचा निर्णय घेतला होता.

Edited By- Dhanashri Naik