नैसर्गिक अनुभूतीचे निसर्ग अभ्यास केंद्र

-सुरेश सानप

पाटणादेवी
वेबदुनिया|
MH News
MHNEWS
निसर्गसौंदर्य नेहमीच मानवाला भुरळ घालीत असते. मनाला मोहिनी घालणार्‍या निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटायला कोणाला आवडणार नाही. वर्षा ऋतुचे आगमन होताच आकाश नभांनी भरुन येते अन् क्षणार्धात धरती जलधारांनी ओलीचिंब होते. पावसाच्या आगमनाने सर्वत्र एक आल्हाददायक वातावरणच निर्माण होते. पावसाने धरतीवर जणू जीवन फुलते.

निसर्ग सौंदर्याने नटलेल्या तालुक्यातील पाटणादेवी अभयारण्यातील निसर्ग अभ्यास केंद्र सध्या पर्यटकांचे एक आकर्षण ठरले आहे. येथील डोंगरावरुन अवखळपणे कोसळणारे धबधबे, डोळयात न सामावणारे निसर्ग सौंदर्य हे निसर्गप्रेमी जनतेसाठी एक पर्वणीच आहे आणि ही पर्वणी अनुभवयाला मिळावी म्हणून मी सुध्दा पाटणादेवी परिसराकडे सहजच आकर्षित झालो. चाळीसगाव उपमाहिती केंद्राला जिल्हा माहिती अधिकार्‍यांबरोबर भेट देण्याचे ठरल्याने पाटणादेवीच्या या निसर्ग अभ्यास केंद्रातही जाण्याचे ठरले.
हिरव्यागार वनराईतून चालत आम्ही येथून जवळच असणार्‍या सुप्रसिध्द पाटणादेवीच्या पुरातन अशा मंदिरात पोहोचलो. त्यानंतर आम्ही अभ्यासकेंद्रात गेलो. या निसर्गरम्य केंद्रात पाटणादेवी परिसरातील वैविध्यपूर्ण अशी माहिती मिळत असल्याने येथे पर्यटकांचा ओघ नेहमीच सुरु असतो. पाटणादेवी परिसरातील धार्मिक स्थळे, औषधी वनस्पती, वन्यप्राणी, पक्षी अभयारण्याची वैशिष्ट्ये, जलप्रवाह अशी विविध प्रकारची माहिती याठिकाणी उपलब्ध करुन दिलेली आहे.
येथील निसर्ग अभ्यासकेंद्रात मूर्ती, छायाचित्र आणि चलचित्र अशा प्रकारात ही माहिती देण्यात आली आहे तर गणितज्ञ भास्कराचार्य यांच्यासंबंधी भिंतीवर कथारुपाने माहिती दिली आहे. ही माहिती वाचताना वेळ कसा निघून जातो हेच कळत नाही. निसर्गाच्या सानिध्यात भान हरपून आपण रमून जातो.

या अभ्यास केंद्रात सध्या तीन खोल्यामध्ये अतिशय सुबकतेने चित्र व चलचित्रांच्या सहाय्याने पाटणादेवी परिसराची माहिती साकारलेली आहे. या केंद्रात एका दगडावर अगदी हुबेहुब बिबटया वाघाचा पुतळा साकारण्यात आला आहे. त्याच्या भोवती लहान बालके अतिशय उत्साहाने खेळत होते. त्यांच्यातील उत्साह पाहून आम्हालाही प्रेरणा मिळत होती. तेवढ्यात आम्हाला काही पशु-पक्षांचे आवाज ऐकू आले. आमच्यासारखेच काही पर्यटक त्या ठिकाणी आलेले होते. त्यांनाही आमच्यासारखेच या आवाजाबाबत कुतूहल होते. तितक्यात अभ्यासकेंद्रातील एका कर्मचार्‍याने या केंद्रात नैसर्गिक वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने रानावनातील पशु पक्षांचे आवाज ध्वनीमुद्रीत करुन ते या ठिकाणी वाजविण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आल्याची माहिती दिली. या सुविधेमुळे पर्यटकांना आपण प्रत्यक्ष जंगलात असल्याचा भास होत असतो.
येथे भेट देणार्‍या पर्यटकांना निसर्ग अभ्यास केंद्राबरोबरच निसर्गाच्या अनोख्या सौंदर्याचा एक आगळा वेगळा आनंद अनुभवायला मिळतो. याच केंद्राच्या प्रांगणात विविध औषधी वृक्ष असून पर्यटकांना त्याची माहिती मिळावी म्हणून फलकावर सविस्तर अशी माहिती दिल्याचे दिसून आले. अशा या निसर्गरम्य परिसरातील या अनोख्या निसर्ग अभ्यासकेंद्राला भेट दिल्यानंतर एक वेगळाच आनंद मिळाला. (महान्यूज)


यावर अधिक वाचा :

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय
प्रेमी एकाच प्लेटमधून शेवपुरी खात होते मुलगा तिच्या डोळ्यात एकसारखा पाहतो मुलगी लाजून ...

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ...

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत
हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा ...

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही
सुप्रसिद्ध हॉलिवूड सिंगर केटी पेरीने मुंबईत परफॉर्म करून भारतीय चाहत्यांची मने जिंकलीत. ...

'गर्ल्स' डे आऊट

'गर्ल्स' डे आऊट
'गर्ल्स' डे आऊट हे शीर्षक वाचल्यानंतर मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. 'गर्ल्स' डे ...

पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ...

पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिका
महाभारत मालिकेचं पुनर्प्रक्षेपण करण्याचा निर्णय घेतला. त्यात महाराष्ट्रातून अनेकांनी ...

कोरोना : अक्षयकुमारची 25 कोटींची मदत

कोरोना : अक्षयकुमारची 25 कोटींची मदत
कोरोनाविरोधात लढा देण्यासाठी संपूर्ण देश एकवटला असून आर्थिक मदत करण्यासाठी पुढाकार घेत ...

‘ब्योमकेश बक्क्षी’ आणि ‘सर्कस’ ही प्रेक्षकांच्या भेटीला

‘ब्योमकेश बक्क्षी’ आणि ‘सर्कस’ ही प्रेक्षकांच्या भेटीला
करोनाचा फैलाव रोखण्यासाठी सरकारने 21 दिवसांचा लॉकडाउन जारी केला आहे. या दरम्यान लोकांची ...

पुन्हा घडणार रामायण

पुन्हा घडणार रामायण
पुन्हा घडणार रामायण

Coronavirus: ‘बाहुबली’ ने केली ४ कोटींची मदत

Coronavirus: ‘बाहुबली’ ने केली ४ कोटींची मदत
करोना विषाणूशी लढा देण्यासाठी देशातील प्रत्येक जण शक्य तितके प्रयत्न करत आहेत. ...