साहसी ट्रेकर्स व पक्षीनिरिक्षकांचे नंदनवन

MH GovtMH GOVT
वगळता तीन्ही ऋतूत आनंद देते. पावसळ्यात येथील जोरात कोसळणार्‍या पावसांत चिंब भिजत भटकायचं, हिवाळ्यात वनराईने नटलेल्या जंगलात मूक्तपणे भटकत पक्षीनिरिक्षणाचा आनंद लुटायचा.

हिवाळ्यात येथे जगभरातून स्थलांतरीत पक्षी वास्तव्यास येतात व ‍पक्षीनिरिक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडतात. कर्नाळा अभयारण्यात पक्षांच्या
जवळपास दिडशे प्रजाती आढळतात. कर्नाळ्याच्या जंगलातून भटकंती अवर्णनीय आनंद देते. देश-परदेशातील पक्षीवैभव आपल्या मधुर सुरावटींनी आपली भ्रमंती अधिकच सुखावह बनवतात.

स्थानीक व स्थलांतरीत पक्षांच्या वास्तव्यानुसार पक्षीनिरिक्षणाचे दोन कालावधी पडतात. परदेशी पाहूणा असणार्‍या ड्रॉगो पक्षाचे हवेत विहरण्याचे व इतर पक्षांच्या आवाजाची हुबेहुब नक्कल काढण्यातील प्राविण्य तर वाखाणण्याजोगेच आहे.

कर्नाळा प‍क्षीअभयरण्यात मुंबई, ठाणे व सभोवतालच्या पर्यटकांची रीघ लागलेली असते. दरवर्षी साधारणत: लाखभर पर्यटक कर्नाळ्याची वाट धरतात. पक्षी निरिक्षकांसोबतच ट्रेकससही मोठ्या उत्साहाने येथील वातावरणात अंगभूत कौशल्य व जिज्ञासू वृत्तीचे दर्शन घडवत असतात. कर्नाळा किल्ल्यावरील पस्तीस मीटरचा सुळका ह्या परिसराची ओळख आहे.

साहसी ट्रेकर्सना तो साद घालत असतो. दुरवरून आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देणारा येथील सुळका ट्रेकर्संच्या साहसाची परिक्षा घेते. कर्नाळा किल्ल्याने मराठा, पोतूर्गिजांसहित सर्वच राजवटीं पाहिल्यात. कर्नाळा किल्ल्याचा इतिहास बाराव्या शतकापर्यंत पोहचतो. मराठ्यांपासून, मोघल व इंग्रजांपर्यंत सर्वच राजवटी त्याने अनुभवल्या.

संपूर्ण परिसर भरगच्च झाडीने व्यापलेला आहे.
MH GovtMH GOVT
वृक्षराजींनी समृद्ध जंगलात कोशींब, आंबा, कळम, उंबर यासारखी वृक्षवल्ली आहेत. किल्ल्यावर चढण्यातील अनुभव अद्वितीय असतो. किर्र झाडीतून वाट काढत किल्ल्याची चढण चढण्याची कसरत भर हिवाळ्यातही अंगातून घाम काढते. कर्नाळ्यात राहण्याची उत्तम व्यवस्था आहे.


वनखात्याने दोन विश्रामगृह आपल्या सेवेत आहेत. त्यासाठी फक्त अगोदर फॉरेस्ट कार्यालयाशी संपर्क साधून आरक्षण करावे लागेल. निसर्गात भटकण्याच्या आवडीसोबतच साहसी ट्रेकर्स व पक्षीनि‍रीक्षणाची आवड जोपासणार्‍या जिज्ञासू पर्यटकांसाठी हे नंदनवनच आहे.

भेट देण्याची वेळ : ऑक्टोबर ते एप्रिल

जाण्याचा मार्ग : कर्नाळ्यास हवाई, रेल्वे व रस्ते मार्गाने येथे पोहचता येते. येथून साधारणत: तीस किलोमीटरवर मुंबई विमानतळ आहे. रेल्वेने जायचे झाल्यास कोंकण रेल्वेने पनवेलला पोहचायचे. पनवेल अगदी जवळ म्हणजे पंधरा किलोमीटर अंतरावर आहे. मुंबई-गोवा महामार्गावर असल्याने अगदी सहजरित्या येथे पोहचता येते.
मनोज पोलादे|


यावर अधिक वाचा :

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय
प्रेमी एकाच प्लेटमधून शेवपुरी खात होते मुलगा तिच्या डोळ्यात एकसारखा पाहतो मुलगी लाजून ...

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ...

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत
हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा ...

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही
सुप्रसिद्ध हॉलिवूड सिंगर केटी पेरीने मुंबईत परफॉर्म करून भारतीय चाहत्यांची मने जिंकलीत. ...

'गर्ल्स' डे आऊट

'गर्ल्स' डे आऊट
'गर्ल्स' डे आऊट हे शीर्षक वाचल्यानंतर मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. 'गर्ल्स' डे ...

पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ...

पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिका
महाभारत मालिकेचं पुनर्प्रक्षेपण करण्याचा निर्णय घेतला. त्यात महाराष्ट्रातून अनेकांनी ...

कोरोना : अक्षयकुमारची 25 कोटींची मदत

कोरोना : अक्षयकुमारची 25 कोटींची मदत
कोरोनाविरोधात लढा देण्यासाठी संपूर्ण देश एकवटला असून आर्थिक मदत करण्यासाठी पुढाकार घेत ...

‘ब्योमकेश बक्क्षी’ आणि ‘सर्कस’ ही प्रेक्षकांच्या भेटीला

‘ब्योमकेश बक्क्षी’ आणि ‘सर्कस’ ही प्रेक्षकांच्या भेटीला
करोनाचा फैलाव रोखण्यासाठी सरकारने 21 दिवसांचा लॉकडाउन जारी केला आहे. या दरम्यान लोकांची ...

पुन्हा घडणार रामायण

पुन्हा घडणार रामायण
पुन्हा घडणार रामायण

Coronavirus: ‘बाहुबली’ ने केली ४ कोटींची मदत

Coronavirus: ‘बाहुबली’ ने केली ४ कोटींची मदत
करोना विषाणूशी लढा देण्यासाठी देशातील प्रत्येक जण शक्य तितके प्रयत्न करत आहेत. ...