' आथांग सागरावर सत्त्ता गाजवायची तर बेलाग समुद्गदूर्ग उभारायलाच हवेत'

श्री. दिलीप तळेकर

bhatkanti
वेबदुनिया|
PR
महाराष्ट्राला सुमारे 720 कि.मी. लांबीचा सागरी किनारा लाभला आहे. हिरवीगर्द झाडी, लाल माती, गरजणारा दर्या आणि रुपेरी वाळू यांचे लेण लेवून कोकण किनारपट्टी आपल्याला साद घालते आहे. या परशुराम भूमीत काजू, फणस, आंबा आणि कितीतरी झाडं मुक्तपणाने डोंगरात वाढतात. मनाला भूरळ पडावी अशा हिरव्यागार मखमली झालरीची शाल घेवून इथली प्रत्येक वस्ती वसली आहे. इथल्या निसर्ग सौंदर्याबरोबर गड, किल्ले, लेणी, गुहा, प्राचीन मंदीरे, अशी ऐतिहासिक स्थानेही आपल्याला पहाता येतात. कोकणचे रमणीय किनारे तिथली लाल माती, माडा पोफळीच्या बागा, आमराई हे सार नितांत सुंदर आहे. पण त्याचबरोबर कोकणच्या मातीला संरक्षण देणारे जलदुर्ग हेही कोकणचं एक आगळ वैशिष्ट आहे. समुद्गात अवघड ठिकाणी सामरिक व्युहरचनेसाठी बांधलेले हे जलदूर्ग महाराष्ट्राचे वैभवच आहे.

सबब जलदुर्गांच्या सहाय्याने उभ्या असलेल्या वेगळ्या वाटेवरचा कोकण पाहण्याचे उद्दीष्ट ठेवून सचिवालय जिमखाना, मुंबई च्या आम्ही 10 सभासंदानी 5 मोटर बाईक घेवून मोटर सायकल मोहिम 23 डिसेंबर ते 27 डिसेंबर, 2009 या कालावधीत आयोजित केली होती. संपूर्ण किनारपट्टीवर मोटारसायकलवरुन फिरताना अनेक दुर्गम ठिकाणी भेटी देता आल्या. त्यामुळे आडवाटेवरच्या कोकणची नव्याने ओळख झाली. या जलदूर्ग सफारीची सुरुवात भाऊचा धक्का (मुंबई) येथून भल्या पहाटे झाली. बोटीत मोटर सायकली ठेवून रेवस धक्क्यावर उतरलो. तेथून भग्न तटबंदी असलेला रेवदंडा किल्ला पाहून थेट कोरलाई किल्ल्यावर गेलो, पुरातत्व विभागाकडून किल्ल्यावर नुतनीकरण संवर्धनाचे काम चालू आहे. तटबंदी चांगल्या अवस्थेमध्ये असून किल्याच्या पायथ्याशी समुद्गातील जहाजांना आधार वाटणारी बत्ती (लाईट हाऊस) ताठ मानेने उभी होती. त्यानंतर जाताजाता नांदगावच्या सिध्दी विनायकाचे दर्शन घेवून पदमदूर्ग, सिध्दीमहल पाहत मुरुड जंजिरा पाहण्यासाठी पोहचलो.
bhatkanti
PR
किनार्‍यावर बाईक ठेवून लाँचने जंजीरा पाहण्यास गेलो. जंजीरा या शब्दाचाच अर्थ मूळी पाण्यातला किल्ला असा होतो. तथापि, सर्रास
जंजीरा किल्ला असा द्विरुक्तीपूर्ण उल्लेख बहुतेकजण करतात. ' 15 व्या शतकात राजपुरीचा कोळीनायक राम पाटील यांच्याकडून नगरच्या निजामशहाच्या पिरमखान सरदाराने घाताने कसा जंजीरा बळकावला आणि जो शेवटपर्यंत मराठयांना जिंकता आला नाही' या इतिहासाची उजळणी करत करत किल्यावरील कलाल बांगडी आणि लांडा कासम या दोन प्रचंड तोफा पाहिल्या. त्यानंतर बोटीने दिघी जेट्टीवर उतरुन एका अंगाला छोटया छोटया टेकडया, कौलारु घरांची टूमदार गाव आणि दुसर्‍या अंगाला अमर्याद विस्ताराचा किनार्‍यावरच्या खडकांना अखंड धडका देणारा, चंदेरी जलराशींनी भरलेला अथांग सागर न्याहळत दिवेआगर गावात शिरलो. स्नानादी करुन शुभर्चित होवून पवित्र मनाने सुवर्ण गणेशाचे दर्शन घेतले. दिवेआगरचा सुंदर समुद्ग किनारा पाहता रात्रीचा मुक्काम तेथेच केला.
दुसरा दिवस श्रीवर्धनच्या पेशवे मंदीराच्या दर्शनाने सुरु झाला. तेथून दक्षिण काशी म्हणून प्रसिध्द असलेल्या श्री क्षेत्र हरिहरेश्र्वर पाशी गेलो. रायगड जिल्हयाचे दक्षिणेकडचे शेवटचे टोक म्हणजे हरिहरेश्वर येथुन वाहणार्‍या सावित्री नदीच्या विस्तीर्ण पात्रामुळे रत्नागिरी व रायगड जिल्हयाची विभागणी झाली आहे. क्षेत्र महाबळेश्वर येथे उगम पावलेल्या पंचगंगेच्या जन्माची कथा आठवत, भक्तीभावाने हरि (विष्णु) - हर (शंकर) यांचे नामस्मरण करीत हरिहरेश्वरचे दर्शन घेतले. भरतीच्या वेळी सागरालाटांच्या तडाख्यांनी डोंगरकडयांवर निर्माण केलेली निसर्गशिल्पे हे एक हरि हरेश्वरच वैशिष्ट आहे. इथल्या समुद्गकिनार्‍यावरुन डॉल्फिनच्या एक मोठया थव्याचे दर्शन आम्हाला घडले. नंतर फेरीने बागमंडला - वेशवी पार करुन बाणकोटच्या हिंमतगडाच्या वाटेला लागालो. जलवाहतुकीच्या दृष्टीने बाणकोटचा हिंमतगड आणि खाडी याला पूर्वी विशेष महत्व होते. जमिनीच्या बाजूस असलेला खंदक आता बर्‍यापैकी बुजत चालला आहे. तटबंदी बरीचशी सुस्थितीत असून त्यावरुन किल्ल्याभोवती फिरता येते. येथुनच खालच्या बाजूस असलेले मॅलेट मेमोरीयल (स्मारक) दिसते. याचा संबंध सुध्दा थेट महाबळेश्र्वरशी आहे. आर्थर मॅलेटची पत्नी सोफीया व ऐलेन व्हैरिएट ही लहान मुलगी मुंबईहून समुद्गमार्गे महाबळेश्वरला सावित्री नदीच्या खाडीतून जात असताना बुडाली. त्यांची दफनभूमी म्हणजेच हे स्मारक. या दु:खद प्रसगांनंतर महाबळेश्र्वरला गेलेला आर्थर मॅलेट सावित्री नदीच्या उगमाशी उंच कडयावर जाऊन ' आपली प्रिय पत्नी व मुलगी याच नदीच्या दुसर्‍या टोकाशी चिरविश्रांती घेत आहेत ' या भावने ने एकांती बसत असे. तोच आजचा महाबळेश्र्वरचा 'आर्थर सीट पॉईंट'.


यावर अधिक वाचा :

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय
प्रेमी एकाच प्लेटमधून शेवपुरी खात होते मुलगा तिच्या डोळ्यात एकसारखा पाहतो मुलगी लाजून ...

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ...

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत
हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा ...

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही
सुप्रसिद्ध हॉलिवूड सिंगर केटी पेरीने मुंबईत परफॉर्म करून भारतीय चाहत्यांची मने जिंकलीत. ...

'गर्ल्स' डे आऊट

'गर्ल्स' डे आऊट
'गर्ल्स' डे आऊट हे शीर्षक वाचल्यानंतर मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. 'गर्ल्स' डे ...

पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ...

पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिका
महाभारत मालिकेचं पुनर्प्रक्षेपण करण्याचा निर्णय घेतला. त्यात महाराष्ट्रातून अनेकांनी ...

कोरोना : अक्षयकुमारची 25 कोटींची मदत

कोरोना : अक्षयकुमारची 25 कोटींची मदत
कोरोनाविरोधात लढा देण्यासाठी संपूर्ण देश एकवटला असून आर्थिक मदत करण्यासाठी पुढाकार घेत ...

‘ब्योमकेश बक्क्षी’ आणि ‘सर्कस’ ही प्रेक्षकांच्या भेटीला

‘ब्योमकेश बक्क्षी’ आणि ‘सर्कस’ ही प्रेक्षकांच्या भेटीला
करोनाचा फैलाव रोखण्यासाठी सरकारने 21 दिवसांचा लॉकडाउन जारी केला आहे. या दरम्यान लोकांची ...

पुन्हा घडणार रामायण

पुन्हा घडणार रामायण
पुन्हा घडणार रामायण

Coronavirus: ‘बाहुबली’ ने केली ४ कोटींची मदत

Coronavirus: ‘बाहुबली’ ने केली ४ कोटींची मदत
करोना विषाणूशी लढा देण्यासाठी देशातील प्रत्येक जण शक्य तितके प्रयत्न करत आहेत. ...