कोकण किनारपट्टीच्या भूप्रदेशात विधात्याने सृष्टीसौदर्याची मुक्तहस्ते उधळण केली आहे. धरती व आकाशास कवेत घेऊ पाहणारा विशाल सह्याद्री व अरबी समुद्रादरम्यान पसरलेला हा चिंचोळा भूप्रदेश म्हणजे नंदनवन आहे. भौगोलिक वैशिष्ट्यामुळे कोकणास निळ्याशार समुद्र किनार्यासोबतच थंड हवेची ठिकाणेही लाभली आहेत. सावंतवाडीपासून जवळच समुद्रसपाटीपासून साडेसहाशे मीटर उंचीवर असलेले अंबोली हे त्यापैकीच एक....