महाराष्ट्रातील जुहू बीचच नाही, तर हे बीच देखील खास आहे

sea beach
Last Modified शनिवार, 5 मार्च 2022 (23:21 IST)
महाराष्ट्रातील जुहू बीच खूप लोकप्रिय आहे आणि लोकांना येथे चांगला वेळ घालवायला आवडते. पण महाराष्ट्रातील हा एकमेव समुद्रकिनारा नाही, तर इथे तुम्ही इतर अनेक समुद्रकिनारे अगदी सहजपणे एक्सप्लोर करू शकता. अशाच काही बीचची माहिती जाणून घेऊ या.

1डहाणू-बोर्डी बीच-
डहाणू-बोर्डी बीच मुंबईपासून 145 किमी अंतरावर ठाणे किनारपट्टीवर पसरलेला आहे. जर आपण एडव्हेंचर्स करण्याची आवड ठेवता तर या बीच वर आपण ग्लाइडिंग, ट्रेकिंग, पतंग उडवणे इत्यादी क्रीडा क्रियाकलापांचा आनंद घेऊ शकता. याशिवाय, आपण
ऐतिहासिक बहरोट गुहेला देखील भेट देऊ शकता, जे मुख्यतः पारशी आणि उदवाडा यांचे तीर्थक्षेत्र आहे. या ठिकाणचे वैशिष्ट्य म्हणजे हजारो वर्षे जुना पवित्र अग्नी आजही तेवत आहे.
2 श्रीवर्धन हरिहरेश्वर-
महाराष्ट्रातील कोकण सीमेवर वसलेला, श्रीवर्धन हरिहरेश्वर समुद्रकिनारा त्याच्या शांत परिसरासाठी ओळखला जातो. ज्यांना सूर्यस्नान, समुद्रकिनाऱ्यावर चालणे, योग आणि ध्यान यासारख्या आरामदायी क्रियाकलापांमध्ये सहभागी व्हायचे आहे त्यांच्यासाठी हे एक योग्य ठिकाण आहे. श्रीवर्धन हरिहरेश्वर बीचवर अनेक रेस्टॉरंट्स आहेत जिथे
उत्तम सीफूडचा आस्वाद घेऊ शकता. एवढेच नाही तर, पेशवे किंवा मराठा साम्राज्याचे पंतप्रधान जिथे राहत होते ती सुंदर भूमी पाहण्यासाठी बोटीतून प्रवास करू शकता. पेशवे स्मारक आणि हरिहरेश्वराचे प्रसिद्ध मंदिर ही येथील काही प्रेक्षणीय स्थळे आहेत.

3 तारकर्ली बीच-
मालवणच्या दक्षिणेस 6 किमी आणि मुंबईपासून 546 किमी अंतरावर महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर उंच सुरुची झाडे आणि कार्ली नदीने वेढलेला तारकर्ली बीच आहे. तारकर्ली बीचचे पाणी अगदी स्वच्छ आहे. येथे आपण स्कूबा डायव्हिंग, स्नॉर्केलिंग, बीच वॉकिंग, सन बेसिंग, सन बाथिंग इत्यादी अनेक गोष्टी करू शकता. तारकर्ली बीचजवळ पाहण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत.
येथे 17 व्या शतकात बांधलेले सिंधुदुर्ग किल्ला आणि पद्मगड किल्ला महाराष्ट्रातील दोन सर्वात महत्त्वाचे सागरी किल्ले आहेत.

4 मार्वे मनोरी आणि गोराई बीच-
मुंबईत मार्वे मनोरी आणि गोराई समुद्रकिनारा आहे जे अनेक पर्यटकांना आकर्षित करतात. सूर्योदय आणि सूर्यास्ताचे विलक्षण दृश्य येथे पाहता येते. हे तीन छोटे बीच
नैसर्गिक सौंदर्याने समृद्ध आहेत येथे लोकांना रात्री उशिरापर्यंत पार्टी करायला आवडते.


यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

गोपू आणि शिंपी

गोपू आणि शिंपी
गोपू शिंप्याकडे गेला आणि त्याला विचारले काका- पॅन्टची शिलाई किती आहे? शिंपी - रु. 300.

लाल सिंह चढ्ढा : 'हे' हिंदी चित्रपट आहेत गाजलेल्या हॉलिवूड ...

लाल सिंह चढ्ढा : 'हे' हिंदी चित्रपट आहेत गाजलेल्या हॉलिवूड सिनेमांची कॉपी
आमिर खान त्याच्या बहुप्रतिक्षित 'लाल सिंह चढ्ढा' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. चार ...

आजोबांची स्माईल

आजोबांची स्माईल
आजोबा पांडू ला हाक मारत असतात. आजोबा -पांडू बाळ माझी कवळी कुठे, आण जरा. पांडू - अहो, ...

Raksha Bandhan Jokes रक्षाबंधन जोक्स

Raksha Bandhan Jokes रक्षाबंधन जोक्स
बायको - आज संध्याकाळी येताना जरा राख्या घेत या. नवरा - तुझ्या भावासाठी मी का आणू? बायको ...

Pradeep Patwardhan Passes Away:मराठी अभिनेते प्रदीप पटवर्धन ...

Pradeep Patwardhan Passes Away:मराठी अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले
Pradeep Patwardhan Passes Away:मराठी सिनेसृष्टीतून एक अत्यंत दु:खद बातमी समोर आली आहे. ...