सोमवार, 6 फेब्रुवारी 2023
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. माझा महाराष्ट्र
Written By
Last Modified मंगळवार, 5 ऑक्टोबर 2021 (16:13 IST)

धर्म स्थळे :मुंबईचे मुंबादेवी मंदिर

मुंबादेवी मंदिर मुंबईच्या भुलेश्वर, येथे आहे.मूंबईचे नाव कोळी बांधवांच्या या देवीआई च्या नावा वरून ठेवण्यात आले आहे. हे मंदिर नवसाला पावणारे आहे. हे मंदिर सुमारे 400 वर्ष जुने आहे. मुंबई मध्ये सुरुवातीला कोळी लोकांचे (मासेमाऱ्यांचे) वास्तव्य होते. कोळी बांधवांनीच बोरीबंदर येथे मुंबा देवी मंदिराची स्थापना केली. देवी आईच्या आशीर्वादाने त्यांचा भरभराट झाला.त्यांना कधीही समुद्रापासून धोका झाला  नाही . हे मंदिर 1737 मध्ये बांधण्यात आले,आज त्या ठिकाणी व्हिक्टोरिया टर्मिनल्स आहे. नंतर इंग्रेजांनी या मंदिराला मरीन लाईन्सच्या पूर्व क्षेत्रात स्थापित केले. पूर्वी याच्या भोवती तिन्ही बाजूने मोठे तलाव होते जे काळांतराने बुजवण्यात आले. या मंदिराच्या निर्माणासाठी जमीन पांडू शेठ ने देणगी स्वरूपात दिली होती. नंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मंदिर ट्रस्ट स्थापित करण्यात आले.आता मंदिर ट्रस्ट या मंदिराची पाहणी करतात.
 
या मंदिरातील देवीची मूर्ती नारंगी रंगाची असून चांदीच्या मुकुटाने सुशोभित आहे. देवीच्या मुर्तीजवळच शेजारी आई अन्नपूर्णा आणि जगदंबेची मूर्ती स्थापित केली आहे. या मंदिरात दिवसातून सहावेळा आरती केली जाते. मंगळवार शुभवार मानला जातो. ही देवी नवसाला पावणारी आहे. भाविक लोक आपला नवस फेडण्यासाठी येथे ठेवलेल्या कठवा (लाकडावर) नाण्यांना खिळे मारून ठोकतात.येथे भाविकांची गर्दी असते.