Dharma Sangrah
✕

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिकला जाणार? प्रवासापूर्वी कोणत्या गोष्टी तपासाव्यात?

Updated: मंगळवार, 3 नोव्हेंबर 2026 (16:53 IST)
२. वाहतूक, मार्ग आणि पार्किंग नियम
वाहनांवरील निर्बंध: कुंभमेळा काळात नाशिक शहर व त्र्यंबकेश्वरमध्ये खाजगी वाहनांना थेट घाटापर्यंत जाण्यास बंदी असते.

आऊटर पार्किंग व ई-बस: तुमची गाडी शहराबाहेरील नियुक्त पार्किंग स्थळांवर लावावी लागते. तेथून प्रशासकीय बस किंवा ई-बसने घाटाकडे जावे लागते.

मार्ग बदल : प्रवासाला निघण्यापूर्वी नाशिक ट्रॅफिक पोलिसांची ताजी मार्गदर्शक नियमावली व बदललेले रस्ते तपासा.

३. राहण्याची व्यवस्था
अ‍ॅडव्हान्स बुकिंग: हॉटेल, लॉज, धर्मशाळा किंवा साधूग्राममधील टेंटचे बुकिंग आधीच पूर्ण करा.
लोकेशनची पडताळणी: तुमचे निवासस्थान मुख्य घाट (रामकुंड/कुशावर्त) किंवा बस स्टँडपासून किती अंतरावर आहे, हे तपासून घ्या.

४. आरोग्य आणि आपत्कालीन तयारी
वैद्यकीय किट : नियमित औषधे, प्रथमोपचार, ओआरएस आणि पेनकिलर्स सोबत ठेवा.
हवामानाचा अंदाज: हवामानानुसार रेनकोट, वॉटरप्रूफ बॅग किंवा टोपी/छत्री सोबत ठेवा.
चालण्याची तयारी: वाहनांना बंदी असल्याने ५ ते १० किमी चालण्याची मानसिक व शारीरिक तयारी ठेवा. आरामदायक शूज वापरणे योग्य ठरेल.

५. लहान मुले व वृद्धांची सुरक्षेबाबत काळजी
ओळखपत्र व संपर्क माहिती कार्ड: लहान मुलांच्या आणि वृद्धांच्या खिशात किंवा गळ्यात नाव, पत्ता, आणि मोबाईल नंबर लिहिलेले कार्ड किंवा रिस्टबँड नक्की घाला.
एकत्र राहण्याचे ठिकाण : गर्दीत चुकून ताटातूट झाल्यास कुठे भेटायचे, हे ठिकाण आधीच ठरवून ठेवा.

६. रोख रक्कम आणि डिजिटल साधने
कॅश सोबत ठेवा: प्रचंड गर्दीमुळे अनेकदा मोबाईल नेटवर्क जाम होतात आणि UPI पेमेंट किंवा ऑनलाइन व्यवहार चालत नाहीत. त्यामुळे पुरेशी रोख रक्कम सोबत ठेवा.
पावर बँक : प्रवास लांबचा असल्याने फोन चार्जिंगसाठी पावर बँक सोबत असणे गरजेचे आहे.
प्रशासकीय अ‍ॅप / हेल्पलाईन: नाशिक पोलिस किंवा कुंभमेळा प्रशासनाचे अधिकृत ॲप, व्हॉट्सॲप हेल्पलाईन आणि आपत्कालीन नंबर फोनमध्ये सेव्ह करून ठेवा.
ALSO READ: दिवाळीत देवदर्शन आणि पर्यटन एकत्र करायचे? नाशिक-त्र्यंबकेश्वरसाठी सहलीचे नियोजन
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा: महत्त्वाच्या तारखा, परंपरा आणि भाविकांसाठी माहिती

सर्व पहा

काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंद्रन यांनी ग्रीसमध्ये लग्न केले, फोटो व्हायरल

रामायणाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला, चित्रपटाची पहिल्या आठवड्यात ४३० कोटींच्या कमाईच्या दिशेने वाटचाल

आफ्टर डार्क'चा पहिला ट्रॅक जो भी होना है हो जाएगा' हे नवीन गाणे प्रदर्शित

मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत माधुरी दीक्षितचा मुलगा गर्लफ्रेंडसोबत! दोघांमधील केमिस्ट्री चर्चेचा विषय

मराठी प्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव यांनी 'रामायण'मध्ये महर्षी विश्वामित्रांची भूमिका साकारली

सर्व पहा

धार्मिक स्थळांव्यतिरिक्त, उत्तर प्रदेशातील नैसर्गिक स्थळे विलक्षण अनुभव देतात; भेट दिल्यावर तुम्हाला पुन्हा परत यावेसे वाटेल

गोळीबाराच्या घटनेनंतर अभिनेता टायगर श्रॉफ पुन्हा चित्रीकरणाच्या सेटवर; 'लग जा गले' चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण

कोकणातील लपलेला स्वर्ग 'वेळास गाव'; जिथे निसर्ग आणि संस्कृती एकत्र नांदतात

गोळीबाराच्या घटनेनंतर अभिनेता टायगर श्रॉफ सेटवर परतला, लग जा गले'चे चित्रीकरण पूर्ण केले

'रामायण' हिट की फ्लॉप? आत्ताच निष्कर्ष काढण्याची घाई का? २००० ते ४००० कोटींच्या बजेटमागील नेमकं सत्य काय?

पुढील लेख
Show comments