1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. महाराष्ट्र दिन
Written By
Last Updated : बुधवार, 1 मे 2024 (11:58 IST)

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

maharashtra din wishes
१ मे महाराष्ट्र दिन : लोकसभा निवडणूक निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. महारष्ट्रातील जनतेला आश्वासन देत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रातील जनतेला मराठी भाषेतून शुभेच्छा दिल्या आहे. 
 
आज १ मे आहे म्हणजे महाराष्ट्र दिवस. आजच्या दिवशी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली होती. महाराष्ट्राला सुंदर निसर्ग, संत, संतांचे अभंग, भारूड, गौळणी, विविध जागृत देवस्थाने यांचे वैभव लाभले आहे. या दिवशी राज्यात मोठ्या उत्साहात महाराष्ट्र दिवस साजरा केला जातो. आज संयुक्त महाराष्ट्राला ६५ वर्षे पूर्ण होत आहे. तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन राज्यात करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील नागरिकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी झेंडा वंदन करून शुभेच्छा दिल्या. तसेच देशाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील मराठी सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या. 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, प्रगती, परंपरा, एकता या उत्तुंग दिपस्थंभाप्रमाणे महाराष्ट्र उभा आहे. महाराष्ट्र दिन म्हणजे या भूमीचा वैभवशाली वारसा आणि अदम्य भावना यांचा गौरव करण्याचा दिवस आहे ज्या भूमीने महान दूरदर्शी घडवले आहेत आणि हा दिवस या राज्याच्या सांस्कृतिक समृद्धीशी संबंधित आहे. परंपरा, प्रगती आणि एकता यांच्या उत्तुंग दीपस्तंभाप्रमाणे महाराष्ट्र उभा आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी काम करत राहण्याच्या आमच्या बांधिलकीचा आम्ही देखील पुनरुच्चार करत आहोत. महाराष्ट्राच्या जनतेला माझ्या हार्दिक शुभेच्छा. 
 
एप्रिल महिन्यामध्ये महिन्याच्या शेवटच्या दोन दिवसांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकसभा निडणुकीसाठी महाराष्ट्रात होते. तसेच महाराष्ट्रात नागरिकंना त्यांनी आवाहन केले की, भाजप आणि आमच्या मित्रपक्षाला भरपूर मतांनी विजयी करा.  

Edited By- Dhanashri Naik