Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे
कामगार नव्हे तो तर किमयागार आहे
अविरत कष्टाची ती परिसीमा आहे
आकार मिळतो अस्तव्यस्त सामुग्रीस
तयार होतं नवीन, सलाम त्यांच्या कष्टास
नवनवीन घरे बांधून देतो तो आपल्याला
गळक छप्पर सदाच त्याच्या वाट्याला
जेवणात जे असतं मिठाचे स्थान
कामगारांस ही आयुष्यात आपल्या तोच मान
सगळं जग कसं ठप्प होईल, जर तो थांबला
म्हणून च कस मंडळी, त्याचाच बोलबाला
कणा आहे तो आपल्या कार्यप्रणालीचा
म्हणूनच मानाचा मुजरा त्यांना आमुचा
-अश्विनी थत्ते