मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. कौल महाराष्ट्राचा
  4. »
  5. झळा दुष्काळाचा
Written By वेबदुनिया|

पंढरपूर देवस्थानचे दुष्काळग्रस्तांसाठी एक कोटी

WD
महराष्ट्रातील भीषण दुष्काळाची परिस्थिती पाहता फूल नाही फुलाची पाकळी म्हणून पंढरपूरच्या प्रसिद्ध विठ्ठल-रुख्‍मिणी देवस्थानने दुष्काळग्रस्तांसाठी एक कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी झालेल्या देवस्थान समितीच्या बैठकीत या संदर्भात एक प्रस्ताव पारित करण्यात आला आहे.

मंदिर संस्थानचे अध्यक्ष अण्णा डांगे यांनी सादर केलेल्या या प्रस्तावात दुष्काळग्रस्तांसाठी एक कोटी देणार असल्याचे म्हटले आहे. आता हा प्रस्ताव अधिकृत परवानगीसाठी न्याय विभागाकडे पाठविला जाणार आहे.