'मनसे'शी कदापि युती नाही- मनोहर जोशी
लोकसभेच्यावेळी मनसेला मत करणार्या मराठी मतदारांना आपली चूक कळली असून विधानसभेत ते तीच चूक करणार नाही, असा विश्वास व्यक्त करत मनसेशी युती करण्याची शक्यता शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व खासदार मनोहर जोशी यांनी फेटाळून लावली. राज्यातील काँग्रेसच्या आघाडी सरकारची धारणे हिंदूविरोधीच असल्याचा आरोपही त्यांनी केला.
मिरज येथे अफजलखान वधाचे चित्र लावल्यावरुन पेटलेल्या दंगलीत प्रशासनाने हिंदूंची केलेली मुस्कटदाबी, हे सरकारच्या हिंदू विरोधी धोरणांचेच उदाहरण आहे, अशी टीका करत जोशी यांनी येत्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला १९९५ पेक्षा चांगले यश मिळेल असा विश्वास व्यक्त केला.
मंगळवारी मुंबई मराठी पत्रकार संघाने आयोजित केलेल्या ङङ्गजागर महाराष्ट्राचा -२००९' या निवडणूक विषयक वार्तालाप मालिकेत मनोहर जोशी यांनी शिवसेनेची विधानसभा निवडणुकीसंबंधीची भूमिका स्पष्ट केली.
राज्यातील जनतेची इच्छा असेल तर शिवसेना स्वतःच्या बळावर देखील निवडणक लढविण्याची ताकद आहेत्र परंतु मित्र पक्षांना विसरायचे नाही, असे पक्षाचे धोरण असल्याचे सांगतानाच जोशी यांनी युती अबाधित असल्याचे व गुहागर मतदार संघा संबंधित मतभेदही लवकरच मिटतील असे सांगितले. युतीसाठी भाजप सोडून इतर कोणत्याही पक्षाचा विचार शिवसेना करत नसल्याचे व मनसेशी कधीही युती करणार नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. लोकसभेच्यावेळी मनसेच्या मराठी माणसाला मतदान करणार्या मतदारांना आपली चूक कळली असून विधानसभेत ते तीच चूक करणार नाही अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
आघाडी सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार लोकांनी द्यावा अशी एकही गोष्ट त्यांनी केलेली नसून मराठी माणसाकडे व हिंदूंकडे त्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केल्याची घणाघाती टीका करत, सत्तेत आल्यास पिण्याचे पाणी, शौचकूप व संपूर्ण साक्षरता या प्रश्नांना शिवसेनेकडून प्राधान्य देण्यात येणार असल्याचे जोशी यांनी सांगितले. परंतु ज्या हिंदुत्वाच्या मुावर शिवसेना निवडणूक लढवित आहे. त्यासंबंधी छेडले असता, मात्र सत्तेत आल्यास हिंदूंच्या विकासासाठी वा संरक्षणासाठी कोणतीही ठोस धोरणे किंवा योजना त्यांना सांगता आल्या नाहीत.
जाती किंवा धर्मावर आधारित आरक्षण न देण्याची शिवसेनेची सुरुवातीपासूनची भूमिका असल्याचे सांगताच मराठा आरक्षणाबाबत मात्र सत्तेत आल्यावरच विचार करु अशी भूमिका जोशी यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना मांडली.