आठवलेंना हवीत सात- आठ मंत्रिपद
ND
NDराज्यातील निकालांचे चित्र स्पष्ट होत असून, राष्ट्रवादी आणि कॉग्रेसचे अनेक उमेदवार आघाडीवर आहेत. यातच तिसऱ्या आघाडीचे काही उमेदवार आघाडीवर असल्याचे चित्र दिसत असून, कॉग्रेस आणि राष्ट्रवादीने पाठिंबा मागितल्यास आपण त्यांना पाठिंबा देण्यास तयार असल्याचे आठवले यांनी स्पष्ट केले आहे.
आज दुपारी या संदर्भात बैठक बोलावण्यात आली असून, यात आघाडीला पाठिंबा द्यायचा का नाही आणि कोणत्या अटींवर द्यायचा या संदर्भात निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

