1. वृत्त-जगत
  2. »
  3. कौल महाराष्ट्राचा
  4. »
  5. खबरबात

कॉंग्रेसची परीवारवाद जोपासत दुसरी यादी

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्‍याच्‍या अखेरच्‍या दिवसपर्यंत अडकून पडलेली कॉंग्रेसची दुसरी यादी गुरुवार रात्री जाहीर करण्‍यात आली. या यादीत दिग्गज नेत्‍यांच्‍या वारसांना उमेदवारी देऊन पक्षाने पुन्‍हा परिवार वाद जोपासला आहे.

अखेरच्‍या यादीत कॉंग्रेसने महाराष्ट्रातील बडे नेते आणि केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांची कन्‍या प्रणिती शिंदे आणि माजी मुख्‍यमंत्री विलासराव देशमुख यांचे पूत्र अमित देशमुख यांना उमेदवारी देण्‍यात आली आहे.

प्रणिती आपल्‍या वडीलांचा मतदार संघ सोलापूरमधून तर अमित देशमुख लातूरमधून निवडणूक लढविणार आहे.