माहिमधून शिवसेनाप्रमुखांचा ''आदेश''!
शिवसनेना नेते सदा सरवणकरांचे आव्हान संपुष्टात आणण्यासाठी दस्तूरखुद्द बाळासाहेब ठाकरे यांना पुढे यावे लागले आहे. सरवणकर यांच्या माहीममधून महाराष्ट्रातील तमाम वाहिन्यांचा लाडका भावोजी, अर्थात होम मिनिस्टर फेम आदेश बांदेकर यांना तिकिट देण्यात आले आहे.
अवघ्या काही दिवसांपूर्वीच बांदेकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. बांदेकर यांना महत्त्वाचे स्थान देण्यात येणार असल्याचे यानंतर उद्धव यांनी सष्ट केले होते.
माहिती मतदार संघावरून मागील आठवड्यात सदा सरवणकर यांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांच्या घरी सेना स्टाइल राडा केला होता. यानंतर सेना माघार घेणार असल्याचे बोलले जात होते.
परंतु या प्रकरणी आता शिवसेनाप्रमुखांनीच हस्तक्षेप करत आज बांदेकर यांच्या उमेदवारीची घोषणा केली. आता सरवणकर काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. माहिमधून शिवसेनाप्रमुखांचा 'आदेश'!
दादर- आपण माहीमला 'आदेश' दिला असे सांगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी माहीम विधानसभा मतदारसंघात 'भावजी फेम' आदेश बांदेकर यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे या मतदारसंघात उमेदवारी वरून निर्माण झालेल्या वादावर पडदा पडल्याचे स्पष्ट झाले.
मुंबईतील माहीम विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचे आमदार सदा सरवरणकर, सुरेश गंभीर आणि मुंबई महानगर पालिकेचे माजी महापौर मिलिंद वै इच्छुक होते. सदा सरवणकर यांना उमेदवारी मिळत नाही असे समजून त्यांच्या पाठीराख्यांनी शिवसेने नेते मनोहर जोशी यांच्या दादर येथील निवासस्थानी तोडफोड केली. या पार्श्वभूमीवर या मतदारसंघाबाबत शिवसेनाप्रमुखांशी चर्चा करून आता या ठिकाणाहून आदेश बांदेकर निवडणूक लढविणार असल्याची घोषणा गुरूवारी सकाळी पक्षातर्फे करण्यात आली.
आदेश बांदेकर यांचे बालपण याच मतदारसंघातील भागात गेले. तसेच सासरही दादरमध्ये आहे. या पार्श्वभूमीवर या मतदारसंघासाठी ते इच्छुक होते आणि अखेर आज अखेर त्यांना याच मतदारसंघातून उमेदवारी मिळाली. यानंतर दूरदर्शनच्या मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना आदेश बांदेकर म्हणाले की, शिवसेनाप्रमुख, हिंदू हृदयसम्राट बाळसाहेब ठाकरे आणि कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी फार मोठी जबाबदारी टाकली आहे. त्यांनी दाखविलेला विश्वास सार्थ ठरवत सकारात्मक राजकारणाच्या माध्यमातून कार्य करावयाचे आहे. त्यासाठी ज्याप्रमाणे महाराष्ट्रातील तमाम वहिन्यांनी विश्वास दाखविला त्याचप्रमाणे या कार्यासाठीही मतदानाद्वारे विश्वास दाखवावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
या मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांसदर्भात ते म्हणाले की, इच्छा व्यक्त करणे यात काही गैर नाही. तरीही लवकरच आपण त्यांना प्रत्यक्ष भेटणार असून चर्चा करणार आहोत. तथापि, काही मतभेद असतील असे आपणास वाटत नाही. कारण विधानसभेवर भगवा फडविणे हे सर्व शिवसैनिकांचे एकच लक्ष्य आहे. त्यामुळे सर्वजण खाांला खांदा लावून काम करतील असा विश्वासही बांदेकर यांनी यावेळी व्यक्त केला.
दरम्यान, या मतदारसंघातील इच्छुक सदा सरवणकर, मिलिंद वै आणि सुरेश गंभीर यांची बांदेकर कशी काय समजूत काढतात यावरच त्यांचे भवितव्य ठरणार आहे .