लोजपाने सोडली तिसर्या आघाडीची साथ
सभेत पासवान, लालूप्रसाद येणार नाहीत!
रिपब्लिकन डावी लोकशाही समिती अखेरपर्यंत अभेद्य राहिल. जागा वाटपावरुन या समितीत फूट पडणार नाही, असा रिपाई नेते रामदास आठवले यांनी केलेला दावा फोल ठरला आहे. लोकजनशक्ती पार्टी जागा वाटपाच्या मुद्यावरुन तिसर्या आघाडीतून बाहेर पडली आहे. त्यामुळे शिवाजी पार्कवर होणार्या जाहीर सभेस लोजपाचे राष्ट्रीय नेते लोजपाध्यक्ष रामविलास पासवान, राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव उपस्थित राहणार नाहीत, हे स्पष्ट जाले आहे.
लोजपाचे मुंबई अध्यक्ष किरण माने, महासचिव/प्रवक्ते मोहन अडसूळ, दिपक जमरे, महाराष्ट्र युवाध्यक्ष रवी गरुड या नेत्यांनी रिपब्लिकन ऐक्य बहुजन अल्पसंख्य आघाडीचे नेते टी.एम.कांबळे यांची भेट घेऊन या आघाडीत सहभागी होण्याची संमती दर्शवली आहे. लोजपा नेते रामविलास पासवान यांच्याशी चर्चा करुन अंतिम निर्णय सकारात्मकरित्या घेऊ असे नमूद केले.
महाराष्ट्रातील २८८ जागांसाठी जागावाटप घोषित करताना आंबेडकरी विचारांच्या अन्य राष्ट्रीय पक्षांना बेदखल ठरवित रामदास आठवले यांनी इतरांनी मोठे होऊ नसे असा प्रयत्न चालविला असल्याचा आरोप करीत आघाडीबाबत आठवले यांची भूमिकाच संशयास्पद असल्याचे अडसूळ म्हणाले. त्याचबरोबर जागा वाटपावरुन तिसर्या आघाडीत बेदिली माजून इतर घटक पक्षही बाहेर पडतील असेही भाकीत अडसूळ यांनी केले.