वचननाम्यासाठी शिवसेनेकडे सूचनांचा पूर
विधानसभा निवडणुकीच्या वचननाम्यासाठी शिवसेनेकडे सूचनांचा पूर येतो आहे, अशी माहिती पक्षाचे प्रसिद्धी प्रमुख शैलेश पाटील यांनी दिली. शिवसेनेचे 'हायटेक कम्युनिकेशन केंद्र' सध्या कोणत्याही पक्षाकडे नाही. त्यामुळे हे केंद्र म्हणजे आगामी काळातील युतीच्या सरकारचे छोटे प्रतिकात्मक स्वरूप आहे, असे ते म्हणाले.
वचननाम्यासंदर्भात ते म्हणाले, की राज्यभरातून साडेतीन हजारावर सूचना आणि तक्रारी जनतेने पाठविल्या आहेत. पाच हजाराहून अधिक जणांनी दूरध्वनी केले आहेत. यात जनतेने राज्याला काय हवे आहे, काय करायला पाहिजे, कर्ज मुक्तीचे ढोंग नको, स्वस्त घर हवे, नोकरी हवी अशा विविध सूचनावजा तक्रारी दूरध्वनी वा ई मेलद्वारे केल्याचे पाटील यांनी सांगितले. त्या तक्रारी वा सूचनांवर विचार करून त्यांचे निरसन करण्याचे प्रयत्न केले जातात आणि त्यानंतर त्या-त्या तक्रारदाराला तुमचा प्रश्न सुटला का अशी विचारणाही केंद्राद्वारे केली जाते अशी माहितीही पाटील यांनी यावेळी दिली.
'माझे सरकार माझा वचननामा' या भूमिकेला अनुसरूनच जनतेच्या सूचनांचा आदर करत त्या वचननाम्यात अंतर्भूत केल्या आहेत असे सांगत युतीचे सरकार सत्तेत आल्यावर जनतेच्या सूचनांवर अंमलबजावणी केली जाईल असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.