बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019
Written By
Last Modified: शनिवार, 28 सप्टेंबर 2019 (15:29 IST)

शिवसेनेचा मुख्यमंत्री बसवणार : उद्धव ठाकरे

युती होणार की नाही, यावरून सुरू असलेल्या उलटसुलट चर्चांना शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांनी पूर्ण विराम दिला. बाळासाहेबांना वचन दिलं आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री बसवणार, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर दावा केला आहे. 
 
मुंबईतील रंगशारदात शिवसेनेचे २८८ मतदारसंघातील इच्छुक उमेदवार आणि जिल्हाप्रमुखांची शनिवारी बैठक झाली. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेची भूमिका मांडली. ठाकरे म्हणाले, “शिवसेनेची स्थापना कोणताही मुहूर्त किंवा काळ बघून झालेली नाही. एकीकडे देश चंद्राकडे झेप घेतोय. मंगळावर पाणी शोधतोय आणि आपण अजून पत्रिकेत मंगळ शोधत बसलो आहे. आयुष्य बदलण्याची जर कोणत्या खड्यामध्ये ताकद असेल, तर जिवंत माणसांमध्ये की ताकद का नसेल,” असे यावेळी ठाकरे यांनी सांगितले.