मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019
Written By
Last Updated : शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2019 (14:04 IST)

कोणतीही राजकीय चर्चा नाही : आशिष शेलार

भाजप नेते आशिष शेलार  यांनी लीलावती रुग्णालयात जाऊन शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. सध्या भाजप आणि शिवसेनेमधील संबंध ताणले आहेत. अशा परिस्थितीत भाजपचे बडे नेते असलेले आशिष शेलार हे संजय राऊत यांच्या भेटीला गेल्याने, चर्चेला उधाण आलं. आशिष शेलार यांनी संजय राऊत यांच्या प्रकृतीची विचारपूस केलीच, शिवाय दोघांनी विशेष कक्षात जाऊन दहा मिनिटे चर्चाही केली.
 
आशिष शेलार यांना याबाबत विचारलं असता, ते म्हणाले, “आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे, आपले वैचारिक मतभेद असोत की नाही, एकमेकांच्या प्रकृतीची विचारपूस करणे ही आपली संस्कृती आहे. शिवसेना नेते आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी मी आलो होतो. कोणतीही राजकीय चर्चा नाही. किंबहुना त्यांनी कमी बोलावं अशीच आमची अपेक्षा आहे, त्यांची प्रकृती नीट राहील, असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. मी  त्यांची विचारपूस केली. भाजपचे पदाधिकारी प्रताप आशरही याच रुग्णालयात अॅडमिट आहेत,त्यांचीही भेट घेतली. यात कोणतीही राजकीय चर्चा नाही” असे सांगितले.