शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. महात्मा गांधी
Written By
Last Updated : बुधवार, 2 ऑक्टोबर 2024 (10:36 IST)

महात्मा गांधी अहिंसेच्या 6 खास गोष्टी

मोहनदास करमचंद गांधी, महात्मा गांधी यांना अहिंसेचे पुजारी म्हंटले जाते. ते अहिंसेवर खूप भर द्यायचे. ते अहिंसेचा मंत्र महावीर स्वामी आणि गौतम बुद्धांच्या अहिंसा सूत्रातून शिकले होते. जे नेहमी गीतेला माता म्हणायचे. महात्मा गांधींचे समीक्षक सांगतात की दोन प्रकारचे लोक असतात. एक हे जे दुसऱ्यांसोबत हिंसा करतात आणि दूसरे हे की जे स्वत: सोबत हिंसा करतात. गांधीजी दुसऱ्या प्रकारचे व्यक्ति होते. असे समजने बरोबर नाही. चला जाणून घेवू या महात्मा गांधींच्या अहिंसे बद्दल 6 खास गोष्टी  
 
1. महात्मा गांधींच्या नीति अनुसार साध्य आणि साधन दोघांची शुद्धी झाली पाहिजे. म्हणजे जर तुमचा उद्देश्य खरा असेल तर त्याची पूर्ती करण्यासाठी खरा मार्ग किंवा विधीचा उपयोग करायला पाहिजे. चाणक्य नीति अनुसार जर उद्देश्य खरा असेल, सत्य आणि न्याय करीता असेल तर साधन कुठलेपण असो याने फर्क नाही पडत. चाणक्यांनी ही नीति संभवत: महाभारतातल्या भगवान श्रीकृष्ण कडून शिकले आहे. तथापि श्रीकृष्णांची नीतिला कोणीच समजू शकले नाही आहे. 
 
2. महात्मा गांधी सांगतात की एकमात्र वस्तु जी आपल्याला पशु पासून भिन्न करते ती म्हणजे अहिंसा.
 
3. आपला समाजवाद किंवा साम्यवाद अहिंसावर  आधारित पाहिजे. ज्यात मालक-मजूर तसेच सावकार-शेतकरी यांत परस्पर सद्भावपूर्ण सहयोग असायला हवा. 
 
4. निशस्त्र अहिंसाची शक्ती कुठल्यापण परिस्थिमध्ये सशस्त्र शक्ती पेक्षा सर्वश्रेष्ठ राहिल. 
 
5. खरी अहिंसा मृत्युशय्येवर पण स्मितहास्य करीत राहिल. बहाद्दूरी, निर्भयता, स्पष्टता, सत्यनिष्ठा या सीमेपर्यंत वाढवा की तीर-तलवार त्यापुढे तुच्छ पडतील. हीच अहिंसेचि साधना आहे. 
 
6. शरीराच्या नश्वरतेला समजून घेवून ते आता राहणार नाही या परिस्थिवर विचलित न होणे अहिंसा आहे .