शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मराठा आरक्षण
Written By
Last Modified: बुधवार, 22 नोव्हेंबर 2023 (21:46 IST)

मोठी बातमी : मराठा आरक्षणासाठी दिलेले 29 पैकी 'इतके' राजीनामे नामंजूर

छत्रपती संभाजीनगर : राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न चांगलाच तापला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आता आरक्षणासाठी राज्य सरकारला 24 डिसेंबरपर्यंतची डेडलाईन दिली आहे. याचसोबत मनोज जरांगे पाटील यांचा महाराष्ट्र दौरा सुरू आहे. त्यांच्या दौऱ्याला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे.
 
तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी राज्यभरातील अनेक लोकप्रतिनिधिंनी आपले राजीनामे दिले आहेत.
 
यामध्ये सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, बाजार समिती सदस्य अशा अनेक लोकप्रतिनिधींचा समावेश आहे. एकट्या फुलंब्री तालुक्यात 29 जणांनी आपला राजीनामा दिला आहे. या  29 जणांपैकी तब्बल 28 जणांचे राजीनामे नामंजूर झाले आहेत.आवश्यक त्या विहित नमुन्यात अर्ज दिले नसल्याने, हे राजीनामे नामंजूर करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.