शुक्रवार, 13 सप्टेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मराठा आरक्षण
Written By
Last Modified: शनिवार, 10 ऑगस्ट 2024 (17:28 IST)

साताऱ्यात भाषणा दरम्यान मनोज जरांगेंना भोवळ आली, रुग्णालयात दाखल

manoj jarange
मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मनोज जरांगे हे मराठा  समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे या साठी लढत आहे. त्यांनी मराठा आरक्षणासाठी शांतता रॅली काढत आहे. 

मनोज जरांगे हे सध्या पश्चिम महाराष्ट्राचा दौऱ्यावर असून आज ते साताऱ्यात एका सभेला संबोधित करत असताना भाषण देताना अचानक त्यांना भोवळ आली आणि ते खाली बसले त्यांचे हात थरथरत होते. त्यांना तातडीनं रुग्णालयात नेण्यात आलं असून उपचारासाठी दाखल केलं आहे. भाषणाच्या दरम्यान त्यांनी अस्वस्थ असल्याचे म्हटले होते. नेमके त्यांना काय झालं. हे समजू शकले नाही त्यांना अशक्तपणा असल्याचे प्राथमिक तपासात समजले आहे. 
 
मनोज जरांगे हे साताऱ्यात भाषण देताना त्यांना भोवळ आली आणि ते खाली बसले. त्यांचे हात थरथरत होते. असे व्हिडीओ मध्ये दिसत आहे. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 
Edited by - Priya Dixit