suvichar

ते शब्द मागे घेतो, दिलगिरी व्यक्त करतो: जरांगे पाटील

मंगळवार, 27 फेब्रुवारी 2024 (19:53 IST)
जरांगे पाटील आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील संघर्ष मागील दोन दिवसांपासून तीव्र झाला होता. फडणवीस यांच्यावर आरोप करताना मनोज जरांगे यांनी अपशब्दांचा वापर केला होता. यावरून आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात मोठा गदारोळ झाला. देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या इतर आमदारांनीही जरांगे यांच्यावर प्रतिहल्ला केला. त्यानंतर अखेर जरांगे यांनी देवेंद्र फडणवीसांची दिलगिरी व्यक्त करत आपले शब्द मागे घेतले आहेत.
 
"देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना तुम्ही शिवराळ भाषेचा वापर केला. हा मुद्दा त्यांनी आज विधानसभेत उपस्थित केला. याबाबत तुमची काय भूमिका आहे?" असा प्रश्न मनोज जरांगे पाटलांना विचारण्यात आला होता. त्यावर ते म्हणाले की, "हो, मी पण बघितलं की त्यांनी विधानसभेच्या पटलावर छत्रपती शिवरायांचं नाव घेत हा मुद्दा मांडला आणि कोणाच्या आई-बहिणीवरून बोलणं योग्य आहे का, असं म्हटलं. मात्र मी देखील माय-माऊलींचा सन्मान करतो. अनावधानाने ते शब्द माझ्या तोंडून गेले असतील, कारण १७-१८ दिवस पोटात अन्न नव्हतं. ते शब्द मी मागे घेतो आणि दिलगिरीही व्यक्त करतो," असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
Edited by: Ratnadeep Ranshoor

सर्व पहा

संत श्री निवृत्तीनाथ महाराज पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

स्त्रियांनी नारळ का फोडू नये? धार्मिक आणि शास्त्रीय कारण ऐकून तुम्हीही थक्क व्हाल!

Mangal Nakshatra Parivartan 2026 मंगळ मृगशिरा नक्षत्रात प्रवेश करणार; २४ जुलैपासून या राशींचे नशीब उजळणार!

काळाकुट्ट तवा स्वच्छ करण्यासाठी महागड्या क्लीनरची गरज नाही; ह्या टिप्स पुरेशा आहे

WHO चा धोक्याचा इशारा! जगातील ९२% लोकसंख्येला कर्करोगाचा धोका; पुरुष आणि महिलांमधील 'या' कॅन्सरचे प्रमाण सर्वाधिक

सर्व पहा

तुकाराम मुंडे यांनी ठाण्यात मोठी कारवाई करत सडका माल विकणारे दुकान सील केले

मोशी दुर्घटनेत मृतांचा आकडा ७ वर, भावेश वाणी यांचा दुर्देवी मृत्यू

LIVE: मोशी दुर्घटनेत मृतांचा आकडा ७ वर, भावेश वाणी यांचा दुर्देवी मृत्यू

फडणवीस नंतर चंद्रशेखर बावनकुळे होणार राज्याचे मुख्यमंत्री संजय राऊतांचा दावा

आता फक्त २४ रुपयांमध्ये JioFinance द्वारे ITR दाखल करा आणि JioPoints चा फायदा मिळवा

पुढील लेख
Show comments