मंगळवार, 12 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मराठा आरक्षण
Written By
Last Modified: मंगळवार, 7 ऑगस्ट 2018 (15:46 IST)

धनगर समाजचे आरक्षण प्रश्न, १० ऑगस्ट रोजी पुण्यात आंदोलन

Maratha Aarakshan
आरक्षण प्रश्नावर सध्या सरकार चांगलेच अडकले आहे. एका बाजूल सकल मराठा समाजा तर्फे जोरदार आंदोलने सुरु आहेत. त्यात आता धनगर समाज सुद्धा त्यांच्या आरक्षण प्रश्नावर गंभीर झाला असून 'भाजप सरकार चले जाव'ची घोषणा देत धनगर समाज पुण्यात येत्या १० ऑगस्टला पुण्यात भव्य आंदोलन करणार आहे. पुण्यातील विधान भवन येथे धनगर समाजातील सर्व आजी-माजी आमदार, महापौर, जिल्हापरिषद सदस्य येऊन एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करणार आहेत. धनगर समाजाला आरक्षण मिळावं यासाठी हे आंदोलन होणार आहे. पुण्यात जलसंधारणमंत्री राम शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली असून, या बैठकीत आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यात आली आहे. विशेष अधिवेशनात मराठा आरक्षणासह सह धनगर आणि इतर समाज्याच्या आरक्षणाबाबतही चर्चा होणार आहे. मराठा आणि धनगर समाज्यातील युवकांनी जरा धिर धरावा आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलु नये असे अवाहन राज्याचे पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांनी शिर्डीत बोलतांना केल आहे. त्यामुळे सरकारने लवकरच यावर तोडगा काढणे गरजेचे असून, लिंगायत समाज सुद्धा आरक्षण मागत आहे.