मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मराठा आरक्षण
Written By
Last Modified: सोमवार, 26 फेब्रुवारी 2024 (11:11 IST)

मराठा आरक्षण : या जिल्ह्यात इंटरनेट आणि एसटी सेवा बंद

mumbai police
मनोज जरांगे  हे मराठा आरक्षण अध्यादेश लागू व्हावा या साठी  10 फेब्रुवारी पासून उपोषणावर बसले आहे. काल आंतरवली सराटी येथे पत्रकार परिषद घेत मनोज जरांगे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. नंतर त्यांचा मोर्चा सागर बंगल्याकडे वळाला मात्र संचारबंदी लागू केल्यामुळे त्यांना आंतरवली सराटी जावे लागले. काही भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. छत्रपती संभाजी नगर बीड, जालना या काही भागात इंटरनेटसेवा बंद करण्यात आली आहे. तसेच छत्रपती संभाजी नगर येथे एसटी वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे 

जालन्यातील अंबड तालुक्यात थेट संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांना  पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जालना -घनसावंगी तालुक्यात तीर्थपुरी गावात अज्ञातांनी बस पेटवून दिल्याची घटना घडली असून अज्ञातांनी तीर्थपुरी गावात अंबड येथून रामासगावा कडे जाणाऱ्या एसटी बसला पेटवले 
 
 Edited by - Priya Dixit