मंगळवार, 12 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मराठा आरक्षण
Written By

मराठा मोर्चासाठी रितेशच्या हटके शुभेच्छा

Maratha Aarakshan
मुंबईत होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाला अभिनेता रितेश देशमुखने हटके पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत. काल मध्यरात्री त्याने ट्विट केले आहे. 
 
रितेशने ‘एक मराठा लाख मराठा #मराठाक्रांतीमोर्चा #मुंबई’ अशा मजकूरासोबत शिवाजी महाराजांचा फोटो शेअर केला आहे.
 
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर लवकरच मराठी सिनेमा बनणार आहे. या चित्रपटात रितेश देशमूख शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. रितेश देशमुख लवकरच बिग बजेट छत्रपती शिवाजी हा सिनेमा घेऊन येणार आहे. जेनेलिया डिसूजा या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. तर रवी जाधव दिग्दर्शन करणार आहेत.