मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मराठा आरक्षण
Written By
Last Modified: बुधवार, 9 ऑगस्ट 2017 (17:14 IST)

मराठा क्रांती मोर्चा : शिष्‍टमंडळाकडून मागण्यांचे निवेदन सादर

मराठा क्रांती मोर्चाच्या शिष्‍टमंडळाने विधानभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्‍यांना मागण्यांचे निवेदन दिले. राज्‍याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख शिष्‍टमंडळाला मुख्यमंत्र्यांकडे घेऊन गेले. यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी शिष्‍टमंडळाचे स्‍वागत केले. 

या शिष्‍टमंडळासोबत माजी मुख्यमंत्री नारायण राणे, शिवसंग्राम संघटननेचे नेते आमदार विनायक मेटे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, आणि विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्‍ण विखे-पाटील उपस्‍थित होते. मराठा मोर्चातील सहा मुलींच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आणि मोर्चाचा समारोप झाला.