Biodata Maker marathi
✕

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल अतिशय निराशजनक : अशोक चव्हाण

Updated: बुधवार, 5 मे 2021 (16:19 IST)
 
देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात कोणतीही चर्चा न करता कायदा केला. केंद्राने १०२ वी घटनादुरुस्ती १४ ऑगस्ट २०१८ ला केली. तर १५ नोव्हेंबर २०१८ ला गायकवाड समितीचा अहवाल आला आणि ३० नोव्हेंबरला मराठा आरक्षणाचा कायदा केला. १०२ व्या घटनादुरुस्तीनुसार राज्य सरकारला आरक्षण देता येत नसताना देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाचा कायदा करुन मराठा समाजाची फसवणूक केली, असं अशोक चव्हाण म्हणाले.
 
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाबाबत राज्य सरकारची भूमिका मांडत आहे. आजचा निकाल निराशाजनक आहे. मराठा समाजसाठी, महाराष्ट्रावर अन्याय करणारा निकाल आहे. राज्यात हा विषय असताना संपूर्ण संविधानिक प्रक्रिया पूर्ण करुन निर्णय घेण्यात आला. त्यानंतर कॅबिनेटनं कायदा मंजूर केला. मुंबई उच्च न्यायालयात आरक्षण टिकलं. देवेंद्र फडणवीस यांच्या काळातच सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं. फडणवीस सरकारनं जे वकील लावले होते. तेच वकील महाविकासआघाडी सरकारनं वकील लावले होते.
 
देवेंद्र फडणवीस यांच्या काळात जितक्या बैठका घेतल्या नसतील तितक्या बैठका घेतल्या गेल्या. सर्वाच्या सहकार्यानं सर्वोच्च न्यायालयात भूमिका मांडली. महाराष्ट्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडली त्यात समन्वयाचा अभाव कधीही नव्हता, असं अशोक चव्हाण म्हणाले. इंद्रा सहानीचा केसचा लॉ सर्वोच्च न्यायालयानं आणि केंद्र सरकारनं ग्राह्य धरला आहे. गायकवाड समितीचा अहवाल, देवेंद्र फडणवीस सरकारनं केलेला कायदा अस्वीकृत केला, असं अशोक चव्हाण म्हणाले.
 
केंद्र सरकारच्या अ‌ॅटर्नी जनरल यांनी १०२ व्या घटनादुरुस्तीनंतर राज्यांना अधिकार नाहीत, असं म्हटलं. त्यांनी पुन्हा राज्यांना अधिकार आहेत, असं म्हणाले. १०२ वी घटनादुरुस्ती १४ ऑगस्ट २०१८ ला झाली. १५ नोव्हेंबर २०१८ ला गायकवाड समितीचा अहवाल आला. ३० नोव्हेंबरला कायदा केला. १०२ व्या घटनादुरुस्तीनंतर राज्याला अधिकार राहिलेला नाही, असं सर्वोच्च न्यायालयानं निक्षून सांगितलेलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी अधिकार नसताना कायदा केला होता. त्यानंतर आता फसवणूक केली जात आहे. मराठा आरक्षणाचा कायदा १०२ व्या घटनादुरुस्तीनंतर केल्यानं सर्वोच्च न्यायालयानं रद्द केला, असं अशोक चव्हाण म्हणाले.

सर्व पहा

थंडीची चाहूल आणि गरमागरम मेजवानी: ५ हिवाळी स्पेशल रेसिपी!

केस गळणे आणि कोरडेपणावर रामबाण उपाय: कांद्याच्या सालींपासून बनवा प्रभाव जादुई तेल आणि हेअर पॅक

पायाच्या तळव्यावर तीळ उघडतो परदेश वारी आणि श्रीमंतीचे योग! वाचा सामुद्रिक शास्त्रातील माहिती

मंदिरांमध्ये हत्ती का ठेवले जातात? त्यांच्यामागची परंपरा आणि धार्मिक महत्त्व जाणून घ्या

गरुड पुराण: चितेवर शरीर जळून राख होते, पण 'या' ५ गोष्टी आत्म्यासोबत जातात!

सर्व पहा

"संजय राऊत 'सर्किट', त्यांना रुग्णालयात भरती करा!" निलेश राणे यांच्या विधानामुळे राजकारणात खळबळ

सुप्रिया सुळे 'इंडिया' आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत, थेट दिल्लीला जाणार

BMW ची नवीन सुपरबाइक 'M 1000 RR' भारतात लाँच; जाणून घ्या किंमत आणि प्रमुख वैशिष्ट्ये

मोदी मंत्रिमंडळाकडून सीमांकन विधेयकाला आणि महिला आरक्षण दुरुस्तीलाही मंजुरी

LIVE: महाराष्ट्रात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी "अनाथांचा नाथ दुष्काळग्रस्त शेतकरी रिक्षा सन्मान'' योजनेची घोषणा

पुढील लेख
Show comments