1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मराठा आरक्षण
Written By
Last Modified: बुधवार, 9 ऑगस्ट 2017 (17:18 IST)

मराठा क्रांती मोर्चा : मुस्लिम समाजाकडून अल्पोहार आणि पाणी वाटप

Maratha Aarakshan

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा देणा-या मुस्लिम समाजाने  मराठा क्रांती मोर्चात सहभागी झालेल्या मराठा आंदोलकांना अल्पोहार आणि पाणी वाटप केले. यावेळी मराठा आंदोलकांनीही टाळयांच्या कडकडाटात त्यांचे आभार मानले. जेजे उड्डाणपूल सुरु होण्याआधी नागपाडा येथे सिग्नलजवळ खास स्टॉल उभारण्यात आला होता. आंदोलक तिथे दाखल होताच मुस्लिम नागरीकांनी अल्पोहाराचे वाटप सुरु केले. यावेळी दोन्ही समाजातील एकोपा दिसून आला.

नागपाडा फ्रूट आणि व्हेजिटेबल असोसिएशन, ऑल इंडिया मिल्ली कौन्सिल आणि रेहमानी ग्रुप व रजा अकादमी, जमात ए उलेमा यांनी तीन स्टॉल लावले होते. त्यामाध्यमातून अल्पोपहार व पाणी वाटप करण्यात आले.