दत्त आरती - जय जय श्रीअनसूयात्मज अवधूता दत्तात्रया हो

dattatreya ashtakam
Last Modified गुरूवार, 2 डिसेंबर 2021 (10:01 IST)
जय जय श्रीअनसूयात्मज अवधूता दत्तात्रया हो । तूं जगज्जननी जनकचि सद्‌गुरु वंद्य तूं लोकत्रया हो ॥धृ.॥

जय जय दिगंबरा, परम उदारा, भवविस्तारा हो । कर जोडुनियां
नमितों सहस्र वेळां, या अवतारा हो । जैसा दिनकर उदयीं लोपति गगनीं असंख्य तारा हो । तैशा आपदा हरती मुखिं निघतांची अक्षरें तारा हो । तं स्मरगामी स्वामी विटलों या मी तापत्रया हो ॥१॥

तूं महायोगी अर्धांगस्त्रीधारी हे मदनारी हो । तूं नट नरनारायण नारायणि नर तूंचि नारी हो । तूं रघुवीर, श्रीनरहरी, हिरण्यकश्यपुह्रदयविदारी हो । ब्रह्मचारी तूं ब्रह्मचि, राधाकृष्ण जय कुंजविहारी हो । तूं दाता, तूं त्राता, तूंचि विधाता, मुनि आत्रेया हो ॥२॥
तूं भक्तांकित जैसी जैसी भक्तीची भावना हो । तैसी तैसी करणी करणें पडे तुज जगजीवना हो । जिकडे पाडस अळवी तिकडे हरणी धांव घे वना हो । उदंड देसी परंतु प्रसाद पदरीं मज घेवेना हो । विश्वरूपासी पाहाया करि पार्थापरि सुपात्र या हो ॥३॥

प्रसन्नवदन सुशोभित कोमल घननीळ तनु साजिरी हो । जटा-मुकुट कुंडलें माळा पीतांबर भरजरी हो केशरी गंध सुचंदन पुष्पें तुलशीदल मंजरी हो । दंड कमंडलुमंडित कृष्णाजिन डमरू खंजिरी हो । आनंदघन स्वरूपाला देवा कधीं पाहतिल नेत्र या हो ॥४॥
सद्‌गुरु माउलि कृपेचि साउलि धरि तूं दयाळु गडे हो । ये आई म्हणतां येसी लगबग नेसुनिया लुगडें हो । जरि झांकिसि तूं एवढें मातें बाळ तुझें उघडें हो । विष्णुदास म्हणे तरि झडतिल कीर्तीचे चौघडे हा । उदंड कविच्या वदनीं सतत वाजतील वाजंत्र्या हो ॥५॥


यावर अधिक वाचा :

दैनिक राशिभविष्य

या एकादशीला शिवाच्या केसांतून प्रकटली माता भद्रकाली, ...

या एकादशीला शिवाच्या केसांतून प्रकटली माता भद्रकाली, उपवासाने दूर होतात सर्व संकटे
ज्येष्ठ महिन्यातील एकादशीला भाद्रकाली एकादशी म्हणतात. या दिवशी भगवान शंकराच्या केसांतून ...

पुरुषसूक्त

पुरुषसूक्त
सहस्त्रशीर्षा पुरुष:सहस्राक्ष:सहस्रपात् | स भूमि सर्वत: स्पृत्वाSत्यतिष्ठद्द्शाङ्गुलम् ...

श्री सूक्त पाठ Shri Sukt Path

श्री सूक्त पाठ Shri Sukt Path
ॐ हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्त्रजाम्। चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आ वह॥ ...

Mangalwar Upay: कर्जापासून मुक्ती मिळवण्यासाठी मंगळवारी हे ...

Mangalwar Upay: कर्जापासून मुक्ती मिळवण्यासाठी मंगळवारी हे उपाय केल्याने होतील बजरंगबली प्रसन्न
भगवान हनुमानाला कसे प्रसन्न करावे : हिंदू धर्मात मंगळवार हा भगवान हनुमानाला समर्पित मानला ...

Apara ekadashi 2022 :26 मे रोजी आहे अपरा एकादशीचे व्रत, हे ...

Apara ekadashi 2022 :26 मे रोजी आहे अपरा एकादशीचे व्रत, हे केल्याने होतो प्राप्त भगवान विष्णूचा आशीर्वाद
भगवान विष्णूचा आशीर्वाद घेणाऱ्या व्रताची कथा पुढीलप्रमाणे आहे. महिध्वज नावाचा एक देवभक्त ...

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा ...

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, शिवलिंगाची जागा सील करून नमाज अदा सुरू ठेवण्याचे आदेश
ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला या ...

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक
मुंबई: अनोळखी क्रमांकावरून मिस कॉल आला. मिस कॉलवरून संवाद रंगला. पुढे फेसबुकवरून मैत्री ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित मजकूर काढून टाकणे म्हणजे शहीदांचा अपमान : केजरीवाल
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्यावरील ...

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून
नाशिक nashik शहरालगत असलेल्या माडसांगवी गावात भीषण प्रकार घडला आहे. संतापलेल्या पतीने ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा डाव? भाजपचा गंभीर आरोप
महाराष्ट्रात सध्या शरद पवार यांच्या मूक संमतीने सरकार पुरस्कृत दहशतवाद माजला असून ...