संबंधित माहिती
- Shri Gajanan Maharaj Aarti श्री गजानन महाराजांची आरती
- एकवीस स्वर्ग मुकुट सप्तही पाताळ चरण आरती बुधवारची
- श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य श्रीवासुदेवानंदसरस्वती स्वामी महाराजांची आरती
- चिंतामणी परिपूर्ण देवाधि देव ब्रह्मांडीं माया ही रचिली त्वां सर्व, आरती मंगळवारची
- सत्राणें उड्डाणे हुंकार वदनी मारूती आरती मराठीत
Shegaon Gajanan Maharaj Aarti शेगावच्या माऊलींची श्री गजानन महाराजांची आरती
श्री गजानन महाराज आरती
जय जय सत्चितस्वरूपा स्वामी गणराया ।
अवतरलासी भूवर जड़ मूढ ताराया ।
जयदेव जयदेव ॥धृ॥
निर्गुण ब्रह्म सनातन अव्यय अविनाशी ।
स्थिरचर व्यापुन उरले जे या जगतासी ।
तें तू तत्त्व खरोखर नि:संशय अससी ।
लीलामात्रे धरिले मानवदेहासी ॥१॥
होऊ न देशी त्याची जाणिव तू कवणा ।
करूनि गणि गण गणात बोते या भजना ।
धाता हरिहर गुरूवर तूची सुखसदना ।
जिकडे पाहावे तिकडे तू दिससी नयना ॥२॥
लीला अनंत केल्या बंकटसदनास ।
पेटविले त्या अग्नीवाचुनि चिलमेस ।
क्षणात आणिले जीवन निर्जल वापीस ।
केला ब्रह्मगिरीच्या गर्वाचा नाश ॥३॥
व्याधी वारून केले कैकां संपन्न ।
करविले भक्तालागी विट्ठलदर्शन ।
भवसिंधु हा तरण्या नौका तव चरण ।
स्वामी दासगणूचे मान्य करा कवन ॥४॥
