Marathi Biodata Maker
✕

श्री परशुराम माहत्म्य अध्याय ४

Updated: बुधवार, 8 मे 2024 (13:32 IST)
ब्रह्मादि आश्चर्य ह्मणती नामातीतासी नाम ठेविती हा विष्णु सर्वनाम गती न जाणती मनुष्यादिक ॥१६॥
हा सर्व व्यापी मायातीत ज्याचे चरण मायासेवित ब्राह्मणांचें कुळदैवत लक्ष्मीनारायण बोलती ॥१७॥
तो हा अवतार धरुनी क्रीडा करी लीलेनी निर्लेप्य केवळ ज्ञानी जीवांतरीं व्याप्य जाणा ॥१८॥
तो हा क्षत्रियासी करील रणा दुष्ट पावतील मरणा गोब्राह्मण रक्षक जाणा एवं रामा नमोस्तुते ॥१९॥
ऐसें स्तवोनि ऋषी देव आपले भाग घोवोनि सर्व लोकीं गेले पुढें अपूर्व ऐका ऋषी सावध चित्तें ॥२०॥
त्द्या अपूर्व भगवत्कथा मृड वंदितो सर्वदा माथा येणेंचि प्रीती रमानाथा ती आदरें वर्णितों ॥२१॥
मग करिती अन्नप्राशन जो ईश्‍वर विश्‍व भक्षण दाढे धरिली पृथ्वी जाण त्याच्या जिव्हे शीत लाविती ॥२२॥
माता ह्मणे बाळा येई मधू अन्नमुखीं घेई मुख पसरी गा माझे आई बोले ऐसी लडिवाळे ॥२३॥
तेव्हां दावी मुखविस्तार पंचभूतें देववर सर्व लोक अब्धी भूधर मुखी अद्भुत देखिलें ॥२४॥
पाहूनि माता भयचकित काय बाळ काहे ह्मणत राक्षस माया किंवा भूत ह्मणूनि नृसींह बोलेती ॥२५॥
रेणुकेसी ह्मणे जमदग्नि भिऊ नको नारायण अग्नि करील सर्व भयभग्नि शांति सूक्त ह्मणेन ॥२६॥
मग तांबूल मुखीं घालोनी केला वाद्य घोष गायनीं आशिर्वाद शांती बोलोनी संपूर्ण करिती हवन ॥२७॥
आता तुह्मीं पुत्रवरा उद्योग परीक्षा करा शस्त्रलेखनी पुस्तक सरा पुढें टाकिली पुत्राचिया ॥२८॥
बाळा लवकरी घेई तें हास्य करुनी रांगेपाई चापत्यन अवरे आई काय करुं ह्मणतसे ॥२९॥
तेव्हां बाळक धांवोनी चपळपणें भिंती कोणीं धरिला फर्शु जावोनी हास्य दावी अपूर्व ॥३०॥
हां हां ह्मणती तेव्हां माय चापल्यानें करुं काय तुह्मीं न करावें हास्य बाय बाळ घ्यावें सत्वरतें ॥३१॥
काय आश्चर्य सर्व ह्मणती महाफर्शु काळगती बाळके धरिला हातीं पुढें काय करील ॥३२॥
मग ते ब्राह्मण मुनी कर्म समर्पिती सुमनीं ध्यानें जाणोनि प्रेमानी ह्मणती परशुराम तयासी ॥३३॥
स्त्रिया वायनातें देती हरिद्रा कुंकुम लाविती नाना उत्साह सूरी ती वाजती वाद्यें मंगल ॥३४॥
दुंदुभी मृदंग ताल सूर सनाई संबल वीणा वेणु शृंगवाद्य शंखादिक सुस्वरजाणा ॥३५॥
गोमुख घंटा चंद्र वाद्य सताल मुर जाझंका वाद्य वाजविती कर ताल आद्य नृत्यगायन करीती ॥३६॥
जमदग्निचे आश्रमा नाना देशीचे ब्राह्मण येऊनि करिती स्तवना विष्णु अवतार ह्मणोनी ॥३७॥
आर्या ॥ कैवारी भक्ताचे ॥ स्मरता हरती त्रिवीध दुःखातें ॥
चरणीं श्री सेवेच्या ॥ तल्लिनता हेचि प्रगट देखाते ॥३८॥
ओव्या ॥ जभटग्नि ह्मणे ब्राह्मणां तुह्मीं करावें भोजना आदरें भक्षण परमान्ना बरवें बरवें ह्मणती ॥३९॥
ब्राह्मण घेऊनि आमंत्रणासी **** सर्वते स्नानासी ऋषीनें प्रार्थिलें धेनूसी भोजनीं तृप्त करा ॥४०॥
एकतां वाक्य कामधेनू भूमीचा अंशती अन्नु इच्छिताचे केले गिरी पूर्णू तेव्हां तयारी भोजनाची ॥४१॥
अगणीत पात्रें मांडिलीं प्रत्येक पात्रीं द्रोणावली ॥ काढील्या विचित्र रंगवल्ली बैसाया पाट रुप्याचे ॥४२॥
वाढणें तेव्हां घेवोनी तीर्थी पुन्हा जावोनी चलावे लवकर सर्व मुनी प्रार्थना असे सकळिकां ॥४३॥
तेच आलोंच ह्मणती ब्राह्मन करोनि नाममुद्रा जाण संध्यापूजा अनुष्ठान आले करोनी लवकर ॥४४॥
हो हो ह्मणती तयारी आचार्य भट्ट द्विजवरी दूर्वासादिअन्नारी येवोनि बैसले ॥४५॥
देवांसी उपजली आशा तेही सर्व ब्राह्मणवेषा अमृताची सोडोनि दिशा आले प्रसाद भक्षावया ॥४६॥
अमीत आले ज्ञानी ब्राह्मण भोळे नामधारक जाण ध्याननिष्ठ नियमीं भक्तिमान वेदपाठक चतुर्वेदी ॥४७॥
ह्मणती अह्मीं आपस्तंब एक ह्मणती हे मुखस्तंब एक ह्मणती भोजनीं अगडबंब अमिताशी आहोत ॥४८॥
ह्मणती काय हो विचित्र शाल्येने दश आहेत पायसांने शतकोशि **** सुमनें सांडगे पर्पट परीचे ॥४९॥
फल पल्लवाच्या शाका शातवधी बहुनामिका दहा आहेत मिष्ट कथिका डाळीच्या उसळी आणीक पैं ॥५०॥
लड्डु करंजि का मांडे कुंकुमा परी पहावडे घीवर अपूप काय दिंडे पुर्‍या असती अपूर्वचि ॥५१॥
पाटवडया खांडवीं सांदन कडबू मोदक समोहन भजीं पारिका सुमौन पोळिका दिव्य पैं ॥५२॥
जिलब्या श्रीखंड सुधारस मेवान्न शिक्रण आंबरस पंचामृत पयादि ॥५३॥
वरी वाढिलें वरान्न तेव्हां अमीत घृत गहन वाढितां कृष्णार्पण ह्मणून भोजना बैसले ॥५४॥
ह्मणाह्मणती गोविंद ॥ ग्रासोग्रासी कीर्तनानंद जो न करीतोचि मंद पाप कंद सर्वदा ॥५५॥
जो गोविंद नामें जेविला तो निराहारी बोलिला जन्ममृत्यु पासोनि सुटला जिवन्मुक्त तोचि पै ॥५६॥
आब्रह्म स्तंभ पर्यंत जगत जालें सर्वतृप्त अन्नब्रह्म ह्मणती सतत अनुपम त्यांतून हे ॥५७॥
जेथें प्रत्यक्ष कामधेनू तेथील अन्ने कितीं वर्णूं तया गोडीचें अनुमानू नकळे कोणासी ॥५८॥
ईश माहात्में पूर्णआन्न वर्णना न पुरती जन्म वेदवेद्य एक राम अह्मीं तया नमीतों ॥५९॥
त्द्या अध्यायामृतातें वाचितां होय सुखातें त्यासी मिळेल अन्नातें भक्तिवांछा होईल ॥६०॥
हें परशुरामचरित्र केलें अमृताचें सत्र तृप्त व्हा श्रोते पवित्र सावधान परिसीजे ॥६१॥
स्वस्त्रीश्री परशुरामविजय कल्पतरु वर्णितां महात्म्य अपारु ऐकतां निःपाप होती नरु चतुर्थोध्याय गोड हा ॥४॥श्रीभ्रुकुळटिळकार्पणमस्तु ॥
 

सर्व पहा

गौरी पूजनात ऐनवेळी मासिक पाळी आली तर काय करावे? जाणून घ्या धार्मिक नियम, पर्याय आणि आरोग्य!

ज्येष्ठा गौरी: महानैवेद्याच्या ताटाची मांडणी व वाढण्याची पद्धत

गणपती बाप्पा आणि गौरीच्या प्रसादासाठी पौष्टिक ड्रायफ्रूट्स खजूर रोल पाककृती

Vishwakarma Jayanti 2026 Wishes in Marathi विश्वकर्मा जयंती शुभेच्छा मराठी

Gauri Geete in Marathi गौरी गणपतीची गाणी

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

पुढील लेख
Show comments