शुक्रवार, 10 एप्रिल 2026
  1. धर्म
  2. »
  3. हिंदू
  4. »
  5. आरती संग्रह
Written By वेबदुनिया|

विष्णूची आरती

विष्णूची आरती
संतसनकादिक भक्त मिळाले अनेक।
स्वानंदें गर्जती पाहूं आले कौतुक ।।1।।

नवल होताहे आरती देवाधिदेवा।
स्वर्गीहुनी सुरवर पाहूं येती केशवा ।।धृ।।

नर नारी तटस्थ टक पडिलें नयना।
ओवाळीतां श्रीमुख धणी न पुरे मना ।।नवला।।2।।

एका जनार्दनीं मंगल आरत्या गाती।
मंगल कौतुकें गाती।
मिळाले वैष्णव जयजयकारें गर्जती ।।नवल।।3।।