गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2017
Written By
Last Modified: शनिवार, 4 नोव्हेंबर 2017 (14:54 IST)

करा लग्नाची घाई, यंदा विवाह मुहूर्त आहेत कमी

यंदा विवाह मुहूर्त कमी आहेत. त्यामुळे इच्छूक जोडप्यांना तसेच विवाह ठरलेल्यांना थोडी घाई करावी लागणार आहे. मुहूर्त कमी असल्याने हॉल मिळणे कठिण होऊ बसले आहेत. अनेक ठिकाणी विवाह हॉल आधीच बुक झालेत. त्यामुळे अनेकांना हॉल बुक करणे अवघड होत आहे.
 

यावर्षात केवळ ५२ विवाह मुहूर्त आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचे विवाह मुहूर्त हे कमी आहेत. डिसेंबर महिन्यामध्ये सर्वाधिक १०, तर त्याखालोखाल मे महिन्यामध्ये ९ मुहूर्त असून जूनमध्ये केवळ ४ मुहूर्त आहेत. मात्र ऑगस्ट ते नोव्हेंबर या काळात चातुर्मास असल्याने या दरम्यान कोणताही मुहूर्त नाही. तर पौष महिन्यात एकही नाही तसेच पुढील वर्षी अधिक ज्येष्ठ मास येत आहे. हा ज्येष्ठ मास १६ मे ते १३ जूनदरम्यान असून एकही विवाह मुहूर्त नाही. 

या महिन्यात मुहूर्त

डिसेंबर – २, १३, १७, १८, २२, २६, २८,२९, ३०, ३१

फेब्रुवारी – ५, ९, ११, १८, १९, २०, २१, २४

मार्च – ३, ४, ५, ६, १२, १३, १४

एप्रिल – १९, २०, २४, २५, २६, २७, २८, ३०

मे – १, २, ४, ६, ७, ८, ९, ११, १२

जून – १८, २३, २८, २९

जुलै – २, ५, ६, ७, १०, १५