suvichar
✕

साप्ताहिक भविष्यफल 1 ते 7 ऑक्टोबर 2017

Updated: शनिवार, 30 सप्टेंबर 2017 (14:32 IST)
 
कर्क  
आपल्या व्यक्तीमत्त्वाचा चांगला ठसा उमटवाल. अनपेक्षित धनलाभाची शक्यता आहे. व्यवसायात मात्र कामाच्यामानाने आपली आवक कमी राहण्याची शक्यता आहे. विश्वास आणि प्रामाणिकपणाने प्रयत्न केलेत तर इतरांची मदतही तुम्हाला होईल. मनातील कल्पना आकारात घेतील. शेजार्यांचे सहकार्य लाभेल. सांस्कृतिक कार्यक्रमात सक्रीय सहभाग घ्याल. समाधान लाभेल. लेखक, साहित्यिकांना आपल्या दर्जेदार लिखाणाबद्दल पुरस्कार मिळतील. दैनंदिन कामात थोडी दगदग झाली तरी त्याचे फळ उत्तम मिळेल. आपले काम दुसर्यावर सोपवू नका. आपले कार्यक्षेत्र विस्तृत करण्याचा प्रयत्न कराल.    
 
सिंह   
जूनी येणी वसूल होतील. आपली आर्थिक बाजू बळकट करणार्या घटना घडतील. सामाजिक क्षेत्रातील आपल्या आघाडीच्या नेतृत्वामुळे समाजात प्रतिष्ठा उंचावेल. इच्छापूर्ती होईल. समोरच्या व्यक्तीची बाजू ऐकूण घेवूनच त्यावर आपले मत व्यक्त करा. ज्या बातमीची अगदी अतुरतेने वाट पाहात होतात ती समजल्यामुळे आपल्या उत्साहाला उधाण येईल. नवीन व्यावसायिक करार घडतील. प्रगतीपथावर मार्गक्रमण करण्यासाठी सतत नवीन योजनांची आखणी कराल. महिला स्वतःच्या पद्धतीने गृह सजावट करतील.महिलांना बदलाची नितांत गरज भासेल. शैक्षणिक क्षेत्रात परदेशातील संस्थांशी संबंध येतील. जूने मित्र भेटतील. सुग्रास भोजनाचे योग येतील.  
 
कन्या  
घरातील वातावरण आनंदी, उत्साही राहील. कुटुंबात धार्मिक शुभकार्याचे आयोजन केले जाईल. मित्रपरिवाराबरोबर वेळ मजेत घालवाल. आपल्या इच्छा, अपेक्षा कृतीत आल्याने समाधान लाभेल. विद्यार्थी वर्गाला शैक्षणिक क्षेत्रात चांगली प्रगती साधता येईल. उच्चशिक्षणासाठी प्रवेश मिळेल. आपल्या सहकार्यांचे सहकार्य मोलाचे ठरेल. मित्रपरिवाराबरोबर करमणुकीच्या कार्यक्रमातून आनंद घ्याल. आपल्या वक्तृत्त्वावर सभोवतालच्या व्यक्ती हुरळून जातील. आपले ध्येय साध्य करता येईल. हितशत्रूंच्या कारवायांवर मोठय़ा युक्तीवादाने मात कराल. मातुल घराण्यातील व्यक्तींशी सुसंवाद साधाल.    
 
तूळ 
घरातील सुखसुविधा वाढविण्याकरीता महिला नवीन खरेदीचे मनसुबे आखतील. सतत पाहुण्यांची वर्दळ राहील. घरात मंगलकार्याची नांदी होईल. गृहउद्योग अथवा जोडधंद्यातून चांगले लाभ घडून येतील. नवनवीन प्रकल्प हाती घेऊन यशस्वीपणे पूर्ण कराल. रेंगाळलेली कामे विना सायास मार्गी लागीतल. भविष्यकाळाच्यादृष्टीने आर्थिक तजवीज करणे शक्य होईल. मोठी आर्थिक उलाढाल केली जाईल. नव्या ओळखी होतील व त्या फायदेशीर ठरतील. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. कामानिमित्त दूरवर प्रवास घडून येतील. जनसंपर्कातून लाभ होतील. सार्वजनिक कामातून आपला नावलौकीक वाढेल.  
 
वृश्चिक   
संततीसंबंधी सुवार्ता कानी येतील. कामानिमित्त प्रवास घडून येतील.नवनवीन अनुकूल घडामोडी घडतील.दुसर्यांकडून काम करुन घेण्यात यशस्वी व्हाल. तब्येतीविषयी डॉक्टरांकडून वेळच्या वेळी तपासणी करुन घ्या. बढती -बदलीसाठी नोकरीत केलेल्या प्रयत्नांना यश येईल. आपल्या इच्छा कृतीत येतील. परक्या माणसाकडून अचानक मदत मिळाल्यामुळे लाभ होतील. जाणीवपूर्वक आपल्या विचारात बदल करण्याचा प्रयत्न करावा. जगाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलावा.धाडसी निर्णय घेतले जातील.  
 
धनु 
पूर्वीच्या मिळालेल्या कामतील ऑर्डर्स वाढविल्या जातील. आपल्या अधिकार कक्षेत वाढ होऊन एखादी सवलत मिळेल. व्यवसाय उद्योगासाठीची कर्ज प्रकरणे मंजूर होतील. संशोधनपर अभ्यासक्रमाची पूर्तता होईल. व्यवसायात जवळच्या नातेवाईकांना सहभागी करून घेणे शक्य असेल तर जरूर करा. नव्या कामाचा प्रस्ताव येईल. सामाजिक, राजकीय क्षेत्रातील व्यक्तींच्या बोलण्याचा चांगला प्रभाव टाकणारा आहे.आपल्या जोडीदारावर आपल्या मतांचा पगडा राहील. जुन्या स्मृतींना उजाळा मिळेल.प्रलोभनातून आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता राहते. हितशत्रूंच्या कारवायांवर मात कराल.  
 
मकर  
चांगल्या व्यक्तींची भेट होईल. कुटुंबीयांबाबत गैरसमज निर्माण होऊ शकतात. विरोधकांना आपले मत पटवून देण्यास यशस्वी व्हाल. वरिष्ठांची मर्जी संपादन करण्यात यशस्वी व्हाल. एखादी भाग्यकारक घटना घडेल. अनुकूल व्यक्तींशी संपर्क साधण्यात यश येईल. आपल्या व्यक्तीमत्त्वाचा चांगला ठसा उमटेल. वाजवी ध्येय प्राप्त करु शकाल. महत्त्वाचे निर्णय शक्यतो पुढे ढकलावेत. महत्त्वाच्या जबाबदार्या पार पाडणे अवघड होईल. स्वसंपादीत धनाचा उपभोग घेता येईल. समाधान लाभेल.   
 
कुंभ 
आपली प्रतिमा डागाळणार नाही यासाठी सतर्क राहा. वाहन चालविताना वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवावे. कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नका.  रवि, बुध तरुणांच्या कौशल्याला वाव देणारे आहेत. नवीन कार्यारंभ करण्याचा उत्साह निर्माण होईल. कामाच्या विस्ताराचा सतत ध्यास घ्याल. कवि, कलाकार, गायक, वादक, लेखक, साहित्यिक यांच्यासाठी हा आठवडा विशेष संधी उपलब्ध करुन देणारा राहील. समोर आलेल्या संधीचा फायदा घ्या. नवीन नोकरीच्या शोधात असणार्या तरुणांना मनाजोगे काम मिळेल. पूर्वी केलेल्या गुंतवणूकीतून लाभ होतील. मित्रपरिवाराबरोबर सुग्रास भोजनाचे योग येतील.  
 
मीन  
सरकारी परवाने मिळतील. सरकारी नोकरीत असलेल्या तरुणांना पदोन्नती मिळेल. आपले अचूक अंदाज व योग्य व्यक्तींकडून मिळणारी मदत यामुळे आज आपली निकड भागणार आहे. तरुणांच्या कौशल्याला चांगला वाव मिळेल. स्वतःची प्रतिष्ठा वाढविण्यासाठी सतत कार्यरत प्रयत्नशील राहाल. व्यवसाय उद्योगात नवीन कल्पना आकार घेतील. आपले ध्येय गाठण्यासाठी अथक परिश्रम कराल. आपल्या आवडत्या छंदास व्यावसायिक स्वरुप देण्यास योग्य काळ आहे. आपल्याला मताचा समाजात आदर होईल.

सर्व पहा

Karwa Chauth 2026 करवा चौथ: अखंड सौभाग्याचा सण; जाणून घ्या पूजा पद्धत, महत्त्व आणि पौराणिक कथा

बुद्धीचा दाता गणपती बाप्पा! बुधवारी अशी करा विशेष आराधना, मिळतील शुभ फळ!

जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी बुधवारी केवळ एक मंत्र जपा, परिणाम बघा

एकवीस स्वर्ग मुकुट सप्तही पाताळ चरण आरती बुधवारची

भारतातील या राज्यांमध्ये दसऱ्याची भव्यता करते पर्यटकांना आकर्षित

सर्व पहा

देवी दुर्गेच्या मूर्तीत वेश्यालयातील माती का वापरतात? जाणून घ्या या 'पुण्य माती'मागचे गूढ!

दिवाळीपूर्वी घरातील या ७ गोष्टी नक्की तपासा; ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येईल!

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा हे बदल; हृदयाच्या आरोग्याची घ्या काळजी

बालासन करण्याचे फायदे जाणून घ्या; योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

१ ते ९ मूलांक: तुमच्या आयुष्यात कोणती व्यक्ती का प्रवेश करते? वाचा सविस्तर

पुढील लेख
Show comments