शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2019
Written By
Last Modified: शुक्रवार, 14 डिसेंबर 2018 (14:46 IST)

मीन राशी भविष्यफल 2019

मीन राशीच्या 2019 च्या राशी भविष्यानुसार यशस्वी माणसे जास्त कृतिशील असतात, हे विधान मीन राशीबाबत बरेच सत्य आहे. गरु ग्रहाची संवेदना जोपासणार्‍या या राशीला बुद्धिमत्तेचे उत्तम वरदान लाभलेले आहे. या वर्षी गुरू ग्रहाचा मानसन्मान जपण्यात ही रास कुठेतरी कमी पडणारनाही. राश्याधिपती गुरू वर्षभर भाग्यस्‍थानात राहत असल्यामुळे तुमच्या आशा आकांक्षा पल्लवीत होतील. परंतु शुभ्र, शनी आणि मंगळ यांच्याकडून होणारा विरोध अडथळे निर्माण करणारा आहे. त्याला समर्थपणे तोंड देण्यासाठी निश्चयाचे बळ उपयोग पडेल. वर्ष 2019 च्या सुरुवातीला शनि – धनु राशि, गुरु – वृश्चिक राशि आणि राहु 6 मार्च, 2019 मध्ये मिथुन राशित असेल. तर केतु धनु राशि, गुरु राशि परिवर्तन करून 30 मार्चला धनु राशि आणि 25 एप्रिलला वृश्चिक राशित गोचर करून 5 नोव्हेंबर ला परत धनु राशित गोचर करेल. हे 10 एप्रिलला वक्री होवून शनि 30 एप्रिलला वक्री होवून 18 सप्टेम्बरला मार्गी होतील.
 
कौटुंबिक जीवन 
कौटुंबिक जीवनात जूनपूर्वीचा काला वधी त्यातल्यात्यात सौख्यकारक आहे. त्यादरम्यान घरातील शुभप्रसंग पार पडतील. कौटुंबिक सुखाची चांगली प्राप्‍ति होईल. या वर्षी घर शिफ्ट करू शकताल किंवा भाड्याच्या घरात देखील जावू शकता. काही महत्‍वपूर्ण घडणार नाही. वैवाहिक जीवन उत्तम व्यतीत होईल आणि मार्च महिन्या नंतर वैवाहिक सुखात आणखी वृद्धि होइल. आपल्या जीवनसाथी बरोबर वेळ व्यतीत करण्याची संधी मिळेल. 
 
लहान लहान तक्रारी होतील परंतु अधिक चिंता करण्याची आवश्यकता नाही. जोडीदारा बरोबर कुठे फिरायला जाताल. रवी शनी प्रतियोगामुळे घरात तसंच बाहेरील जगातही वातावरण वादातीत राहील. एकूण केंद्रातील या ग्रहाच्या चौखूर उधळण्याने गुरू ग्रहही काहीसा हतबल ठरेल. कुणी कुणाला समजून घ्यावे हा प्रश्न सतत त्रास देत राहील. पण 31 जुलैला चतुर्थात प्रवेश करणारा शुक्र वातावरणात बदल घडवून आणेल.
 
आरोग्य
या वर्षभरात तुमचे आरोग्य चांगले राहील. असे असले तरी तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. स्वत:ला सुदृढ ठेवण्यासाठी तुम्ही योगासने, व्यायाम, धावणे इत्यादींचा अवलंब करा. तुमचे दैनंदिन आयुष्य अधिक आरोग्यदायी करा. सकाळी लवकर उठा आणि रात्री वेळेवर झोपा. चांगले आरोग्य राखण्यासाठी पुरेशी झोप घ्या. तुमचे मन शांत ठेवण्यासाठी ध्यानधारणा करा. आरोग्याबाबत जास्त काळजी करण्याची गरज नाही. 
मार्च ते मे महिन्यामध्ये आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे. कुठले गंभीर कार्डिएक किंवा श्वासासंबंधी त्रास होऊ शकतील.
 
करियर
तुम्ही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सुदृढ असाल तर तुम्ही करिअरमध्ये गगनभरारी घ्याल. कामाच्या ठिकाणी तुम्ही नवी ओळख निर्माण कराल. मेहेनती, समर्पित वृत्ती असलेला, प्रामाणिक कर्मचारी म्हणून तुमची प्रतिमा तयार होईल. २०१९ सालच्या राशी भविष्यानुसार तुम्हाला काही आर्थिक आव्हानांना सामोरे जावे लागेल आणि त्यामुळे या वर्षभर तुम्हाला आर्थिक बाबतीत काळजी घेण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे कोणताही 
जोखीमयुक्त निर्णय घेताना तुम्ही नीट विचार करा. अथवा तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावे लागण्याची शक्यता आहे. करियर साठी उत्तम वेळ आहे. मार्च नंतर चांगले अवसर प्राप्‍त होतील. करियर मध्ये प्रगति होईल. दशमेश दशम भावात विराजमान असेल आणि त्या मुळे तुम्हाला शुभ फळांची प्राप्ती होईल. गुरु ग्रहानी धनु राशित गोचर केल्या वर तुमच्या करियर मध्ये वाढ होईल.
 
व्यवसाय
व्‍यापाराच्या क्षेत्रात मिळते जुळते फळ प्राप्त होतील. या वर्षी तुमच्या द्वारे ज्या योजना आखल्या जातील त्यातील काही योजना सफळ होतील. तुम्ही जशी आशा कराल त्या प्रमाणे होणार नाही. पैशाची टंचाई भासेल. कुटुंबातील कुठल्या व्यक्तीला कर्ज घ्यावे लागेल. व्यापार उद्योगात परिस्थिती तात्पुरती सुधरते आहे, असे वाटत असताना जानेवारी या दरम्यान स्पर्धकांच्या पवित्र्यामुळे तुम्ही चिंतेत पडाल. फेब्रुवारीनंतर ही परिस्थिती सुधारेल. अपेक्षित पैसे एप्रिल मे च्या दरम्यान हातात पडतील. जूनपासून एका खर्चिक पर्वाला सुरुवात होईल, पण हे खर्च प्रगतीच्या दृष्टीने अत्यावश्यक असल्यामुळे तुम्हाला त्याचे वाईट वाटणार नाही. उद्योगधंद्यात नोकरीत यश लाभेल. सत्याच्या साहाय्याने विरोध पूर्णपणे मावळेल. पण ज्या रवीने पराक्रम स्थानात मदत केली तोच चतुर्थातला रविप्रवेश राहूच्या संगतीत अतितापदायक ठरेल.
 
रोमांस
या वर्षात तुमच्या शृंगारिक आयुष्यात मात्र गोंधळाची स्थिती राहील. तुमच्या शृंगारिक नात्याबद्दल तुमच्या मनात किंतु निर्माण होईल. तुमच्या जोडीदारासमवेत एखाद्या विषयावरून तुमचा वाद होण्याचीही शक्यता आहे. तरुणांना वैवाहिक जीवनात पदार्पण करता येईल. त्यानंतर तडजोड असेल. या वर्षी तुमच्या रोमांटिक लाइफ पर ज्‍यादा असर पडणार नाही. प्रेमासाठी खूप चांगली वेळ चालू आहे. कुठल्या नवीन नात्याची सुरुवात होणार आहे. मार्चपर्यंत लहान लहान समस्या येतील परंतु जास्त काळजी करण्याची गरज नाही.
 
उपाय
सात्‍विक जीवन आणि सकारात्‍मक विचार ठेवावेत, अस केल तर या वर्षी कुठले त्रास उत्पन्न होणार नाहीत.