मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

पत्रिकेत सर्वात जास्त लोकप्रिय असतो बुधादित्य योग

पत्रिकेत ज्याप्रमाणे ग्रह योग असतात व्यक्ती जीवनात तसेच कर्म करतो. जर व्यक्तीच्या पत्रिकेत बुधादित्य योग असेल तर तो फार धनवान आणि समृद्ध बनू शकतो. बुधादित्य योग कुंडलीत सूर्य आणि बुधाच्या युतीमुळे बनतो. पत्रिकेत कुठल्याही स्थानात सूर्य आणि बुध असतील तर हा योग बनतो. असा योग असणारा व्यक्ती अतिबुद्धिमान आणि चतुर असतो. तो प्रत्येक समस्येचे निवारण डोक्याने करतो. तो  व्यक्ती बोलण्यात वाचाल आणि निपूर्ण असतो. जास्त करून असे पाहण्यात आले आहे की असे योग असणारे जातक बुद्धी वाणीच्या क्षेत्रात जास्त यशस्वी होतात आणि याच गुणांमुळे ते धनी होतात.  

सामान्यत : असे बघण्यात आले आहे की सूर्यासोबत कुठलाही ग्रह असल्यास तर त्याचा प्रभाव क्षीण किंवा अस्त झाल्यासारखा होतो पण बुधासोबत सूर्य न तर क्षीण होतो व अस्त ही होत नाही. बलकी जास्त प्रभावशाली होऊन जातो. बुध जर दहा डिग्री अंशापासून कमी असल्यास तर तो निर्बळ असू शकतो पण तरीही त्याचा प्रभाव तर असतोच. हा अती दुर्लभ योग नसून बर्‍याच पत्रिकांमध्ये हा योग आपल्याला दिसून येतो पण याला सामान्य समजणे हे चुकीचे आहे. ज्या लोकांच्या पत्रिकेत हा योग असतो तो नक्कीच धनवान होतो.