सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2020
Written By
Last Modified: रविवार, 31 मे 2020 (14:42 IST)

Monthly Astro : जून (2020) महिन्यातील राशिभविष्य

मेष : या महिन्याच्या अखेरीस आपल्याला अनेक फायदे होतील. मानाजोगे काम होईल. आत्मविश्वास जरासा कमी होणार असल्याने खचून जाऊ नका. जिवनात चढ-उतार सुरुच रहातात.परस्परातील विश्वास वाढेल. मानसिक आरोग्य सुधारेल. व्यापार, नौकरीत फायदा होईल. मेहनत करणार्‍यांना या महिन्यात योग्य तो मोबदला मिळेल. कोर्टाची पायरी चढण्‍याची पाळी आलीच तर काळजी करु नका. यातून कायमची सुटका होईल. विकासयोजना राबवाल. उत्तरार्धात गृहचिंता राहील. पोटाची तक्रार जाणवेल. दि. 20 नंतर शनि 9 वा येईल. कायदेशीर बाबींकडे लक्ष द्या. विवाह जुळतील. आर्थिक प्राप्ती चांगली होईल.  
 
वृषभ : एखादे महत्वाचे काम करायचे असल्यास त्याची जबाबदारी अंगावर पडेल. स्वाभिमानी बनाल. धंद्यातील मरग ळ कमी होईल. उत्तरार्धात आर्थिक प्राप्ती जमेतेम राहील. खर्च कमी करा. वाहन जपून चालवा. दि. 20 नंतर शनि 7 वा स्वत: बरोबर व जोडीदाराच्या आरोग्यास सांभाळा. ती पूर्णत्वास नेण्‍याचा प्रयत्न करा. आर्थिक कामकाज चांगले राहिल. व्यवहारात पारदर्शकता ठेवा. पार्टनरशी मतभेद होण्‍याची शक्यता आहे. या महिन्यात आत्मविश्‍वास वाढेल. नवीन सहकारी भेटतील. जुन्या मित्रांची पुन्हा भेट झाल्याने मन प्रसन्न राहिल. अनेक जुन्या कटु आठवणी पुन्हा त्रास देण्‍याची शक्यता असल्याने वर्तमानाचा विचार करा.
 
मिथुन : नवीन सहकारी भेटतील. जुन्या मित्रांची पुन्हा भेट झाल्याने मन प्रसन्न राहिल. अनेक जुन्या कटु आठवणी पुन्हा त्रास देण्‍याची शक्यता असल्याने वर्तमानाचा विचार करा. नौकरीत आणि व्यापारात उत्साह दिसून येईल. नौकरीत प्रमोशन होण्याची शक्यता आहे. मिळेल. व्यवसायात साहस दाखवण्याचा प्रयत्न कराल. मोठे खर्च निघतील. यशाची खात्री नसेल. उत्तरार्धात प्रयत्नपूर्वक धंद्यात चैतन्य आणाल. क्रोध आवरा. वैवाहिक जीवनात त्रास  संभवतो. दि. 30 नंतर विपरीत घटनेतून लाभ संभवतो. निर्णायक कामात यश मिळेल. 
 
कर्क : या महिन्यात अर्थप्राप्ती चांगली होईल. आर्थिक योग उत्तम असतील.खर्च करताना आपल्या उत्पन्नाचाही विचार करा. खरेदी करताना निट काळजी घ्या. विक्री करताना समोरच्या व्यक्तीची चौकशी करुन निर्णय घ्यावा. कौटुंबिक समस्या निर्माण झाल्याने मनात असंख्‍य विचार घर करतील. मनातील कोलाहल जिभेवर येऊ देऊ नका. मनावर रागावर संयम ठेवा. आपण काय बोलतोय याकडे लक्ष द्या. एखाद्याचे मन दुखवेल असे वक्तव्य करणे महागात पडेल. उत्तरार्धात कायदेशीर अडचणी व मोठे खर्च अनुभवाल, वैवाहिक जीवनात वाद संभवतात. दि. 20 नंतर शनि पाचवा. आर्थिक आवक कमी होईल. कुटंबात अशांतता जाणवेल. विवाह जुळतील. 
 
सिंह : बढतीची शक्यता राहील. धंदा वाढेल. उत्तरार्धात आर्थिक प्राप्ती अपेक्षेप्रमाणे होईल. मनातील कोलाहल जिभेवर येऊ देऊ नका. मनावर रागावर संयम ठेवा. आपण काय बोलतोय याकडे लक्ष द्या. एखाद्याचे मन दुखवेल असे वक्तव्य करणे महागात पडेल. संकट ओढावल्यास सल्ला देणारे अनेक जण असतात, पण योग्य निर्णय आपल्यालाच घ्यावा लागत असतो, हे लक्षात ठेवा. अस्वस्थता वाढवणारा महिना आहे. नवीन रोग जडतील. व्यसनांपासून दूर रहा. मानसिक अस्वस्थता कायम राहिल. क्रोध आवरा. स्थावरादी लाभ होतील. विवाह जुळतील. रोजगार मिळेल. घरात मानपमान नकोत. 
 
कन्या : धार्मिक कामासाठी खर्च होईल. उत्तरार्धात धंदा वाढेल. मानातील शंका दूर होतील. नवीन मैत्री होईल. आर्थिक योग उत्तम. कर्ज, खर्च, करार यांना प्राथमिकता द्या. संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न कराल. मनाला अस्वस्थ करणारी घटना घडेल. आर्थिक संकटं निर्माण होतील. या महिन्यात कोणतेही काम करताना सतर्क रहा. आर्थिक व्यवहार करताना त्यात पारदर्शकता ठेवा. व्यक्तीगत स्वार्थापासून दूर रहाण्‍याचा प्रयत्न करा. प्रवास योग संभावतो. नोकरीत बढतीची शक्यता राहील. परदेशगमन, दूरचे प्रवास घडतील. उद्धिष्टपूर्तीसाठी  दि. 20 नंतर 3 रा शनि प्रयत्नशील बनवेल. 
 
तूळ : शारीरिक दगदग होईल. उत्तरार्धात आर्थिक कोंडी सुटेल कामासाठी प्रवास घडेल. काळानुसार वेगवान होण्यास शिका. या महिन्यात अनेक संधी येतील, पण आपल्या आळशीपणामुळे त्या आपल्यापासून दूर जातील. वेळ गेल्यावर रडत बसण्‍यात अर्थ नाही हे समजून घ्या. विद्यार्थ्यांनी आळस टाळून अभ्यास करण्‍याची गरज आहे. महिलांनी खरेदी करताना आपल्या ऐपतीचा विचार करावा. या राशीच्या व्यक्तींच्या विचारात सातत्याने बदल होत असतात. स्वत:चे विचार इतरांसमोर न मांडता ते गुप्त ठेवणे, एखाद्या घटनेचा धुर्तपणे विचार करणे अशा काही सवयीही या राशीच्या व्यक्तींमध्ये दिसून येतात. भाग्यकारक संधी येईल. दि. 20 नंतर शनि दुसरा, आर्थिक आवक घटेल. परदेशगमन घडेल. मित्रांना ओळखा. 
 
वृश्चिक : प्रवास घडेल. अहमपणा राहील. मुत्सद्दी व प्रभावशाली रहाल. स्वत:चे विचार इतरांसमोर न मांडता ते गुप्त ठेवणे, एखाद्या घटनेचा धुर्तपणे विचार करणे अशा काही सवयीही या राशीच्या व्यक्तींमध्ये दिसून येतात. या राशींच्या व्यक्तींमध्ये अंतर्गत राग खूप अधिक असतो. स्वत:ला मनस्ताप करुन घेण्‍याची सवय असल्याने या राशीच्या व्यक्तींमध्ये ह्रदयविकाराचे प्रमाण अधिक दिसून येते. उत्तरार्धात आर्थिक कोंडी जाणवेल. नोकरी धंद्यात दि. 20 नंतर पहिल्या शनिमुळे अडचणी येतील. स्पर्धकांचा अंदाज घ्या. वाहन जपून चालवा. 
 
धनू : कामे यशस्वी होतील. उत्तरार्धात प्रवास घडेल. दि. 20 नंतर शनि 12वा आर्थिक आवक घटेल. प्रगती, यश, प्रतिष्ठा या गोष्टी या महिन्यात भरपूर मिळणार आहेत. आत्मविश्वा वाढवणारा महिना असल्याने अनेक कामं मार्गी लागतील. विवाह जुळून येतील.मंगल कार्य घडतील. प्रतिष्ठा मिळवून देणारा महिना असल्याने वातावरण चांगले राहिल. शारीरिक व्याधींतून सुटा होईल. मनाजोगे कामं होतील. कष्ट करावेच लागणार असल्याने आळस टाळा. कायदेशीर कटकटी जाणवतील. गुणवत्ता वाढवा. गाफील राहू नका. कला-क्रीडा क्षेत्रात चांगले काम होईल. 
 
मकर : छंदिष्टपण राहील. उत्तरार्धात कामे यशस्वी होतील. या महिन्यात तुम्हाला नशिबाची साथ मिळणार आहे. मन प्रसन्न होईल. अनेक संकटं येतील, पण त्यातून आपोआपच सुटका होण्‍याची शक्यता आहे.  प्रतिष्ठा मिळवून देणारा महिना असल्याने वातावरण चांगले राहिल. शारीरिक व्याधींतून सुटा होईल. मनाजोगे कामं होतील. कष्ट करावेच लागणार असल्याने आळस टाळा. व्यापार, नौकरीत फायदा मिळेल. आर्थिक योग चांगले आहेत. या महिन्यात तुम्हाला नशिबाची साथ मिळणार आहे. हौसमौज कराल. दि. 20 नंतर शनि लाभात येईल. अपेक्षेप्रमाणे लाभ होतील. वाहनसौख्य लाभेल. विवाह जुळतील. कौटुंबिक समस्या राहतील. 
 
कुंभ : आईवडिलांची चिंता राहील. उत्तरार्धात मानची कुचंबणा होईल. मानसिक आरोग्य सुधारेल. मन प्रसन्न रा‍हिल. साहस वाढेल. घाई-गडबडीने निर्णय घेऊ नका. आर्थिक फायदा मिळेल. करार किंवा कायदेविषयक बाबींमध्ये सतर्क रहा. राजकारणात प्रवेश करण्‍याचा विचार मनात घोळ घालेल, परंतु जरा विचार करुन निर्णय घ्या. साहित्यिकांसाठी हा महिना उत्तम आहे.शारीरिक तक्रारीकडे लक्ष द्या. पती पत्नीत ताणतणाव रहतील. दि. 20 नंतर शनि दशमान. कामाची जबाबदारी वाढेल. 
 
मीन : आर्थिक परिस्थिती चांगली राहिल. जुन्या ठरवलेल्या योजना पूर्ण होतील. प्रॉपर्टीचे काम मार्गी लागेल. कुटुंबाचे चांगले सहकार्य मिळेल. संगीत क्षेत्रात असलेल्या व्यक्तींसाठी चांगला महिना. एखादे महत्वाचे काम करायचे असल्यास त्याची जबाबदारी अंगावर पडेल. ती पूर्णत्वास नेण्‍याचा प्रयत्न करा. उत्तरार्धात कामें यशस्वी होती. प्रयत्नवादी रहाल. हौजमौज कराल. दि. 20 रोजी शनि 8वा होईल. आरोग्य बिघडू शकेल. आर्थिक आव क घटेल. विसरभोळेपणा जाणवेल.