Marathi Biodata Maker
✕

Health Horoscope 2020 आरोग्य राशिभविष्य: वृषभ

Updated: सोमवार, 16 डिसेंबर 2019 (11:55 IST)
 
आपणास वारंवार चिंताग्रस्त होण्याची तक्रार होऊ शकते. त्या साठी वेळोवेळी वैद्यकीय सल्ला घ्या जेणेकरून आपण आपल्या चांगल्या आरोग्याचा आनंद घेऊ शकाल. काम आणि विश्रांती ह्याचा दरम्यान संतुलन स्थापित करा. 
ह्या वर्षाची सुरुवात आपल्या आरोग्यासाठी फारशी शुभ नाही. एखादा मोठा आजार उद्भवू शकतो, ज्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर करू शकतो. जर आपण बऱ्याच काळापासून एखाद्या आजाराने ग्रस्त असाल तर काळजी घ्या.  
 
मार्च ते जून ह्या काळात आपल्या आजारांपासून मुक्त होण्याचे संकेत आहे आणि त्या काळात आपण चांगले आरोग्याचा आनंद घ्याल. मानसिकदृष्ट्या देखील तुम्ही संतुलित असाल. ह्या काळात आपल्या खाण्याच्या सवयी आणि दैनंदिन जीवनशैलीत सुधारणा होईल.
 
आपल्याला आपले मानसिक विचार नियंत्रित करावे लागतील नाहीतर आपला मूड थोडा खराब होऊ शकतो. कामापासून दूर राहून आपण विश्रांती घेतली पाहिजे. थकव्यामुळे आपल्याला शारीरिक त्रास उद्भवू शकतात. म्हणूनच, ह्या काळात आपण हे टाळणेच योग्य असेल.
 
आपल्याला मज्जातंतू आणि स्नायूंशी संबंधित समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. आपण आपल्या आहार आणि दिनचर्येकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. ज्यामुळे आपल्या शारीरिक क्रियेत बदल होईल आणि आपण निरोगी राहाल.
आपण आपली ऊर्जा शक्ती फार काळजीपूर्वक वापरली पाहिजे. योग्य ठिकाणी ऊर्जा वापरल्यास आपणास कोणतीही शारीरिक व्याधी उद्भवणार नाही. त्याची दक्षता घेणे गरजेचे आहे. 
 
वर्षाच्या मध्य काळात आपणास अधिक परिश्रम करावे लागेल, त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होईल. त्या काळात आपल्या शारीरिक समस्यांना सामोरा जावं लागेल. आपण मानसिकरीत्या त्यासाठी सज्ज व्हायला हवे. जेणेकरून आपण हा काळ चांगला घालवू शकाल.
 
हे वर्ष आपल्यासाठी चांगली संधी घेऊन येणार आहे. आपणास प्रत्येक क्षेत्रात आपली उत्कृष्ट कामगिरी करावी लागेल जेणेकरून ह्याचा चांगला  परिणाम म्हणून आपल्याला प्रत्येक क्षणाचा मनसोक्त आनंद घेता येईल. ह्या मुळे आपले मनोबल वाढेल .

सर्व पहा

Diwali 2026 Wishes in Marathi दिवाळी शुभेच्छा संदेश मराठी

पाडव्या दिवशी पत्नीला ओवाळणी काय द्यावी? महिलांसाठी खास सरप्राईज आयडियाज

नरक चतुर्दशीला कारिट पायाने का फोडले जाते? जाणून घ्या नरकासूर वधाची कथा

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

"बाजरीची भाकरी आणि गव्हाचे पदार्थ वर्ज्य?" – वसुबारसच्या नैवेद्याचे रहस्य

सर्व पहा

१०० रुपयांत धनत्रयोदशी पूजा आणि सोने-चांदी न घेता समृद्धी आणणारे ५ उपाय

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

पुढील लेख
Show comments