मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2020
Written By
Last Modified: शनिवार, 29 ऑगस्ट 2020 (19:15 IST)

साप्ताहिक राशीफल 30 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर 2020

मेष : व्यक्तिगत आणि व्यावसायिक गरजेना पूर्ण करण्यासाठी तुम्ही नवीन वस्तूची खरेदी करण्याचे मन बनवाल. पण तुम्ही त्याचे आनंद घेण्यास चुकाल. व्यवसायात तुम्हाला सरकारी कारणांमुळे काही अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे. भौतिक सुख सुविधेत वाढ होईल, पण तुम्ही मानसिक व्याकुलतेमुळे त्याचा आनंद घेण्यास मुकणार आहात. 30 ते 3 तारखेपर्यंत तुम्ही तुमच्या मुलांकडे अधिक लक्ष्य द्याल. विद्यार्थी वर्गासाठी हा काळ अनुकूल आहे. 
 
वृषभ : तुम्हाला शैक्षणिक यशामुळे शाळा, कॉलेज किंवा समाजात सन्मान मिळण्याची शक्यता आहे. सर्वश्रेष्ठ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती पुरस्कार मिळणार आहेत. जोडीदाराचे आरोग्य काळजीचा विषय बनेल. तुम्ही तुमच्या व्यवसायात या आठवड्यात उत्तम कामगिरी करणार आहात आणि त्यात तुम्ही गुंतवणूक कराल. नोकरी करणार्याच लोकांसाठी आठवडा फारच उत्तम जाणार आहे. या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी तुम्ही उत्तम वैवाहिक जीवनाचा सुख अनुभवाल. लग्नोत्सुक जातकांसाठी हा आठवडा फारच अनुकूल आहे.   
 
मिथुन : तुमच्या व्यय स्थानाचा मालक मंगळ आणि कुटुंब स्थानाचा मालक सूर्य दोन्ही धन स्थानात युतीत असून दुसर्याा घरात आहे. व्यवसायात गुंतवणूक मुळे तुमचा हात तंग राहू शकतो. बँक लोनचाहफ्ता आणि व्याज हे तुमच्या चिंतेचा विषय ठरणार आहे. 4 आणि 5 तारखेच्या दरम्यान तुम्हाला थोडा धीर मिळेल. करियरसंदर्भातील नवी संधी मिळण्याची शक्यता. त्यामुळे घरांत उत्साहाचे वातावरण होईल. तुम्हाला तुमच्या ओळखीच्या लोकांकडून मदत मिळणार आहे पण ती तुमच्या गरजेपेक्षा फारच कमी राहणार आहे. 
 
कर्क : कुटुंबीयांशी निगडित बाबींमध्ये सध्या समाधान होण्याची शक्यता फारच कमी आहे. काही प्रकरणांमुळे तुम्हाला न्यायालयीन खटल्यात अडकण्याची शक्यता आहे. जोडीदाराच्या प्रकृतीमुळे तुम्ही काळजीत असाल. जर तुम्ही अस्वस्थ जाणवाल तर त्वरित डॉक्टरांना भेटा आणि स्वतःची मेडिकल चाचणी करा. डोळ्यांशी संबंधित आजार होण्याची शक्यता आहे. विद्यार्थी वर्गाला त्यांच्या मेहनतीच्या बळावर परिणाम मिळतील. प्रवेश परीक्षांमध्ये देखील यश मिळेल. नोकरी करणार्या लोकांना जर नोकरीत बदल करायचा असेल तर 3 तारखेनंतर विचार करावा.  
 
सिंह : या आठवड्याची सुरुवात तुम्ही पूर्ण उत्साहाने कराल. तुमच्या लग्न स्थानात मंगळ आणि सूर्याची युती असेल, जेव्हाकी या स्थानाचा मालक बुध व्यय भावात आहे. विचारांमध्ये उग्रता येऊ शकते. या आठवड्यात तुमचा समाजात मान सन्मान वाढेल. कौटुंबात देखील तुम्हाला महत्त्व मिळेल. सरकारी अधिकारी आणि उच्चाधिकार्यांर सोबत होणारी भेट तुम्हाला येणाऱ्या भविष्यात चांगली फलदायी ठरणार आहे. प्रोफेशनल क्षेत्रात तुमचे संबंध उत्तम राहणार आहे. 
 
कन्या : 2 आणि 3 तारखेदरम्यान शेयर बाजार, मशीन आणि ब्रोकर सारख्या कार्यांमध्ये तुम्हाला लाभ होण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. नोकरीच्या स्थानात शनी वक्री आहे यामुळे तुमच्या प्रत्येक कार्यांमध्ये विलंब आणि अडचणी येतील. प्रत्येक शनिवारी मारुतीला तेल आणि शेंदूर अर्पित करावा किंवा शनी महाराजाचे दर्शन घ्यावे. तुम्ही तुमच्या विरोधींमुळे जमीन, घर किंवा स्थायी मालमत्तेच्या प्रकरणात एखाद्या न्यायालयीन खटल्यात अडकू शकता. 
 
तूळ : आर्थिक फायदेसाठी हा आठवडा आधीपेक्षा उत्तम आहे. पण कमजोर पक्ष असा आहे की तुमच्या धन स्थानाचा मालक सूर्य आहे, जो व्यय स्थानात मंगळासोबत असल्यामुळे गैर जरूरी खर्च किंवा मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. या वेळेस तुम्हाला आधी केलेल्या गुंतवणुकीमुळे फायदा मिळू शकतो किंवा जर कोणाला पैसे उधार दिले असतील तर ते परत मिळण्याची शक्यता आहे, खास करून ते धन जे मिळण्याची उमेद तुम्ही पूर्णपणे सोडली असेल. या काळात लांबणीवर गेलेले बरेच काम पूर्ण होतील आणि काही बाबींचे समाधान निघू शकतात. 
 
वृश्चिक : व्यक्तिगत आणि व्यावसायिक उद्देश्यासाठी नवीन वाहन खरेदीचे योग तयार होत आहे. घरात वस्त्र दागिने, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स, सुख सुविधा इत्यादी साधनांची खरेदी करू शकता. विद्यार्थी वर्गासाठी वेळ अनुकूल नाही आहे. दूरस्थ किंवा परदेशात राहत असलेल्या ओळखीच्या लोकांशी संपर्क वाढेल. आठवड्याच्या पहिल्या दिवशी तुम्ही मानसिक बेचैनी अनुभवाल. तुमची स्थिती डगमग राहील, म्हणून या वेळेस कुठल्याही प्रकारचा महत्वपूर्ण निर्णय घेऊ नका. 
 
धनू : संपूर्ण आठवडा धन मिळाल्यामुळे तुम्ही प्रसन्न राहाल. या वेळेस तुमच्या हातात जेवढे ही काम असतील ते पूर्ण होण्याची पूर्ण शक्यता आहे. उद्योग असलेल्या जातकांना चांगला फायदा मिळणार आहे. तुम्ही नवीन मशीनरी किंवा जागा विकत घेऊ शकता. तुम्हाला व्यापार विस्तारणीसाठी कौटुंबिक सदस्यांची मदत मिळेल, खास करून पुत्रांची. हा आठवडा तुमच्यासाठी फारच लाभदायक ठरणार आहे. तुम्हाला तुमच्या व्यापारासाठी एक नवीन विश्वासू भागीदार मिळण्याची शक्यता आहे. 
 
मकर : आठवड्याच्या सुरुवाती आणि शेवटचा टप्पा तुमच्यासाठी उत्तम आहे. परंतु मधला काळ थोडा कठिण जाणार आहे. 4 तारखेला तुम्हाला कुणाकडून भेटवस्तू मिळू शकते. आठवड्याच्या शेवटी तुमच्या स्थितीत थोडी फार सुधारणा येईल. जमीन, घर व स्थायी मालमत्ता विक्री केल्यामुळे धन लाभ होण्याची शक्यता आहे. नवीन गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगणे फारच आवश्यक आहे. वाहन चालवताना बेपर्वाई करू नका, नाहीतर अपघात होण्याची शक्यतेला नाकारता येत नाही. या आठवड्यात खर्च अधिक होण्याची शक्यता आहे.
 
कुंभ : कौटुंबिक बाबतीत विनम्रतेची वागणूक करून त्याचे समाधान काढा. शेयर बाजारात विचार करून गुंतवणूक करा. त्याशिवाय तुम्ही तुमच्या व्यवसायाला विस्तृतकरण्यासाठी नवीन उप कार्यालय किंवा स्टोअर उघडू शकता. बायको किंवा मुलीच्या नावावर एखाद्या नवीन व्यवसायात गुंतवणूक केल्याने तुम्हाला नक्कीच फायदा होईल. जे लोक विवाह करण्यास उत्सुक आहे त्यांच्यासाठी हा काळ अनुकूल आहे. या आठवड्यात तुमची भेट एखाद्या प्रभावशाली व्यक्तीशी होण्याची शक्यता आहे, आणि ही भेट तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. 
 
मीन : ज्या लोकांना परदेशात जायचे आहे त्यांना नक्कीच या आठवड्यात यश मिळेल. पार्टनरशिप असलेल्या व्यवसायात लाभ होण्याची शक्यता आहे. भागीदारीत नवीन व्यवसाय सुरू करण्याचा योग जुळून येत आहे. द्यार्थी वर्गासाठी हा आठवडा अनुकूल आहे. गणेशजींचा सल्ला आहे की थोडे सावधगिरीने चाला. या आठवड्यात आईच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच, स्वतःच्या आरोग्याकडेही लक्ष द्यावे लागणार आहे. तुमच्या उजव्या डोळ्या किंवा कानाचा त्रास होऊ शकतो. या आठवड्यात तुम्हाला शोक संदेश मिळण्याची शक्यता आहे.