माणूस माझे नाव
- बाबा आमटे
माणूस माझे नाव, माणूस माझे नावदहा दिशांच्या रिंगणात या पुढे माझी धाव...बिंदु मात्र मी क्षुद्र खरोखरपरी जिंकले सातहि सागरउंच गाठला गौरीशंकरअग्नीयान मम घेत चालले आकाशाचा ठाव...मीच इथे ओसाडावरतीनांगर धरुनी दुबळ्या हातीकणकण ही जागवली मातीदुर्भिक्ष्याच्या छाताडावर हसत घातला घाव...ही शेते अन् ही सुखसदनेघुमते यातून माझे गाणेरोज आळवित नवे तराणेमी दैन्याच्या विरुद्ध करतो क्षण क्षण नवा उठाव...सुखेच माझी मला बोचतीसाहसास मम सीमा नसतीनवीन क्षितिजे सदा खुणवतीदूर दाट निबिडात मांडला पुन्हा नवा मी डाव...बाबांच्या आयुष्यातील ठळक टप्पेबाबा तथा मुरलीधर देवीदास आमटेजन्म - २६ डिसेंबर १९१४१९५८ - रॅमन मॅगसेसे पुरस्कार१९८६ - पद्मविभूण, पहिला जी. डी. बिर्ला पुरस्कार१९८८ - मानवी हक्क पुरस्कार .१९९० - टेंपल्ट पुरस्कार .१९९१ - राईट लाइव्हली हुड पुरस्कार .पर्यावरणासंबंधीचा ग्लोबल ५०० पुरस्कार .१९९९ - म. गांधी पुरस्कार .कुष्ठरोग्यांसाठी संस्था स्थापन केल्या -सोमनाथ - मूल(चंद्रपूर)आनंदवन - वरोरा (चंद्रपूर)अशोकवन - नागपूरनागेपल्ली, हेमलकसा येथे लोकबिरादरी प्रकल्प.'
ज्वाला आणि फुले' हा काव्यसंग्रह'
उज्ज्वल उद्यासाठी' (काव्य)'
माती जागवील त्याला मत'थोर समाजसुधारककुष्ठरोग निर्मूलन , पुनर्वसनआनंदवन मूळच्या खडकाळ जमीनीत शेतीविषयक विविध प्रयोग.राष्ट्रीय एकात्मतेचे कट्टर पुरस्कर्ते१९८५ - शंभर दिवसांचे भारत जोडो आंदोलन .नर्मदा बचाव आंदोलनाचे नेतृत्वसामाजिक नैसर्गिक पर्यावरण क्षेत्रात सक्रिय कार्य.