गुरूवार, 19 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By

Anti Aging Face Pack वाढत्या वयातही तरुण दिसायचे असेल तर हे नैसर्गिक फेस पॅक वापरा

anti aging
Anti Aging Face Pack फळे आणि भाज्या खाल्ल्याने आरोग्याला फायदा तर होतोच पण त्या चेहऱ्यावर लावल्याने अनेक फायदे होतात. चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते, डाग दूर होतात, त्वचा तरूण दिसते, सुरकुत्या आणि पिंपल्सची समस्याही बऱ्याच अंशी कमी होते. तुम्हालाही तुमचा चेहरा डागरहित बनवायचा असेल आणि वाढत्या वयातही तरुण राहायचे असेल, तर हे फेस पॅक आपल्या ब्युटी रुटीनमध्ये सामील करा.
 
त्वचा चमकदार व्हावी यासाठी काही नॅचरल फेस पॅक्स  
1. एक चमचा दही, 1/2 लहान चमचा जवाचे पीठ, 1/2 लिंबाचा रस मिसळून पेस्ट तयार करा. हे चेहर्‍यावर 5 मिनिटे लावून ठेवा. नंतर कोमट पाण्याने धुवा. याने त्वचेवरील डाग दूर होण्यास मदत होईल.
 
2. 3/4 कप दही, 2 तुकडे टरबूज, 1/2 आडू, 1/2 काकडी याची पेस्ट तयार करा. त्वचेवर 20 मिनिटे लावून ठेवा नंतर धुऊन घ्या. याने त्वचा टाइट होण्यास मदत होते.
 
3. केशर त्वचेसाठी खूप चांगले आहे. केशरमध्ये नैसर्गिक रसायने असतात जी त्वचेचा रंग हलका करतात. कच्च्या दुधात चिमूटभर केशर मिसळा आणि थोडा वेळ राहू द्या. हवे असल्यास केशर दूध बनवून फ्रीजमध्ये ठेवा. जेव्हाही फेस पॅक बनवा तेव्हा त्यात केशर दूध मिसळा.
 
4. दोन मोठे चमचे दही, जरा ऑलिव तेल, 1/4 लहान चमचा लिंबाचा रस आणि एक तुकडा टरबूज मिसळून चेहर्‍यावर लावा. सुकल्यानंतर गार पाण्याने धुवा. याने सुरकुत्या दूर होतात आणि रंग उजळतो.
 
5. टोमॅटो हे नैसर्गिक ब्लीच आहे. टोमॅटोचा लगदा घ्या. हवे असल्यास त्यात हळद टाका. ते कोरडे होईपर्यंत चेहऱ्यावर ठेवा. त्यानंतर चेहरा धुवा. याला नियमित लावल्याने रंग उजळू लागतो.
 
6. पपईची पेस्ट, चिमूटभर हळद आणि लिंबाचा रस देखील रंग उजळण्यासाठी चांगले काम करतात. दोन चमचे पपईची पेस्ट आणि अर्धा लिंबाचा रस एकत्र करून चेहऱ्यावर लावा आणि थोडा कोरडा झाल्यावर धुवा. आठवड्यातून एकदा याचा वापर करा.
 
अस्वीकरण: औषध, आरोग्य टिप्स, सौंदर्य सल्ला, योग, धर्म, ज्योतिष इत्यादी विषयांवर वेब जगतात प्रकाशित/प्रसारण केलेले व्हिडिओ, लेख आणि बातम्या फक्त तुमच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधीचा कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.