Biodata Maker marathi
✕

केस मजबूत आणि सुंदर बनवण्यासाठी कांद्याचे तेल लावा

Updated: मंगळवार, 13 मे 2025 (20:54 IST)
 
केसांना चमकदार आणि मऊ बनवते
जर तुमचे केस कोरडे आणि निर्जीव झाले असतील तर कांद्याचे तेल केसांमध्ये ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करते आणि त्यांना नैसर्गिक चमक देते.
 
केसांची मुळे मजबूत करते
कांद्याच्या तेलात सल्फर भरपूर प्रमाणात असते जे केसांची मुळे मजबूत करण्यास मदत करते. यामुळे केस गळती कमी होते आणि केस तुटण्याची समस्याही हळूहळू कमी होते.
ALSO READ: केसांच्या मजबूतीसाठी अळशीपासून बनवलेला DIY हेअर मास्क वापरा
कोंडापासून आराम मिळतो
हिवाळ्यात कोंड्याची समस्या सामान्य आहे. कांद्याच्या तेलात अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म असतात जे टाळू स्वच्छ ठेवतात आणि कोंडा दूर करण्यास मदत करतात.
 
पांढऱ्या केसांसाठी फायदेशीर
कांद्याच्या तेलाचा नियमित वापर केल्याने केस पांढरे होण्याची समस्या कमी होण्यास मदत होते कारण त्यात अँटी-ऑक्सिडंट्स असतात जे पांढरे केसांसाठी चांगले मानले जातात.
ALSO READ: केस गळणे आणि कोंडा कमी करण्यासाठी बडीशेप उपयुक्त आहे फायदे जाणून घ्या
कसे कराल 
तेल थोडे गरम करून टाळूवर लावा नंतर बोटांनी डोक्याच्या मुळांना लावून 10 ते 15 मिनिटे हलक्या हाताने मसाज करा. असं केल्याने रक्ताभिसरण सुधारते.
हवे असल्यास तेल रात्रभर लावून किंवा 1 ते 2 तास लावून तसेच ठेवा. नंतर सौम्य शाम्पूने केस धुवून घ्या.आठवड्यातून 2 ते 3 वेळा हे लावल्याने केसांना फायदा मिळतो.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By - Priya Dixit 
 

सर्व पहा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

सर्व पहा

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

हिवाळ्यात आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर चवदार ''पालक कढी रेसिपी''

हिवाळ्यात केस कोरडे व निर्जीव होतात? नक्की ट्राय करा हे आयुर्वेदिक घरगुती तेल!

नेलपेंट काढण्यासाठी थिनरची गरज नाही; घरच्या घरी या सोप्या टिप्स करा ट्राय

Bhaubij 2026 विशेष भावासाठी बनवा झटपट रोझ कोकोनट बर्फी

पुढील लेख
Show comments