शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By

चहेर्‍याप्रमाणे निवडा टिकली

कपाळावर टिकली लावली नाही तर भारतीय शृंगार अर्धवट वाटतो असे म्हणायला हरकत नाही. टिकली लावल्यावर परंपरा तर झळकतेच चेहर्‍यात गोडावाही येतो. आपल्या चेहर्‍याचा शेपप्रमाणे टिकलीची निवड केल्यास सुंदरता अजूनच वाढते. पहा आपल्या चेहर्‍यावर कोणत्या शेपची टिकली जमेल ते:
 
 

राउंड शेप
गोल चेहर्‍यावर लांब टिकल्या खूप उठून दिसतात. मोठी गोल टिकली लावणे टाळावे कारण अशात चेहरा अजून लहान दिसतो.
 

ओव्हल शेप
हा शेप असलेल्या महिलांचे कपाळ आणि हनुवटी एकाच प्रमाणात असतात आणि गालाचे हाड उभारलेले असतात. या शेपवर कोणत्याही प्रकाराची टिकली सूट करते. तरी ओव्हल शेप चेहर्‍यावर लांब टिकली तेवढी काही जमत नाही कारण अशात चेहरा अजून लंबूळका दिसतो.

स्क्वेअर शेप
कपाळ, गालाचे हाडं आणि जबडा एकाच रुंदी असल्यास आपल्यावर गोल किंवा व्ही आकाराची टिकली उठून दिसेल. इतर भूमिती आकाराची टिकली लावणे टाळा कारण यामुळे आपला चेहरा विचित्र दिसू शकतो.

हार्ट शेप
उभारलेले गाल, टोकदार हनुवटी आणि रुंद कपाळ. अर्थातच आपल्या चेहरा हार्ट शेप घेतलेला आहे. अशात बारीक डिझाइन किंवा लहान टिकली लावायला हवी. मोठी टिकली लावल्याने कपाळ अजून मोठं दिसेल.

ट्राएंगल शेप
टोकदार हनुवटी आणि मजबूत जबड्यासह लहान कपाळ. अश्या चेहर्‍यावर लहान किंवा डिझाइनर टिकली छान दिसते. या शेपरवर कोणत्याही शेपची टिकली छान दिसते. तरी शेप निवडण्यापूर्वी प्रसंग आणि ड्रेसला मॅच करणे योग्य ठरेल.