खरबूजचे साल फेकू नका, तर या प्रकारे बनवा फेसपॅक मिळावा आरोग्यदायी त्वचा
उन्हाळयात खरबूज हे फळ बाजारात सर्वत्र उपलब्ध असत. खरबूज आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते तसेच आपण खरबूज खाल्ल्यानंतर नेहमी त्याचे साल फेकून देतो. पण तुम्हाला माहित आहे का खरबुजाचे साल हे चेहऱ्यसाठी खूप लाभदायक आणि आरोग्यदायी असते. तुम्ही खरबूजाच्या सालापासून फेसपॅक बनवू शकतात.
खरबूज फेसपॅक-
उन्हाळ्यात चेहऱ्यावर कोरडेपणा येतो. कधी कधी कोरडेपणा मॉइश्चराइजर लावल्याने देखील जात नाही. असावेळेस खरबुजाची साल घेऊन त्यामध्ये दही आणि ओट्स पावडर घालावी. व बारीक वाटून घेऊन पेस्ट बनवावी. हा फेसपॅक चेहऱ्यावर लावून ठेवावा मग 15 मिनिटांनी चेहऱ्याचा मसाज करा . व थंड पाण्याने धुवून घ्या. यामुळे चेहऱ्यावरील उन्हामुळे आणलेला काळेपणा दूर होऊन, चेहऱ्यावर ओलावा राहील व उजळपण येईल.
तसेच खरबूजच्या सालावर मध टाकून चेहऱ्यावर घासावे. यामुळे त्वचेवर होणारी फाईन लाईन्स दूर होईल. तसेच त्वचेला इलास्टिसिटी मिळेल.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik