शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By

Dark Circles या 5 Home Remedy डार्क सर्कलची समस्या दूर करतील

Dark Circles
Dark Circles Remedies ग्लोइंग आणि डागरहित त्वचा कोणाला नको असते आणि जर तुमची त्वचा फ्लॉलेस असेल तर तुमचा आत्मविश्वास आणखीच वाढतो. अनेक लोक फ्लॉलेस त्वचा असल्यानंतरही काळ्या वर्तुळाच्या समस्येने त्रस्त असतात. गडद वर्तुळांमुळे चेहरा निस्तेज आणि थकलेला दिसतो. यासोबतच रक्ताची कमतरता, कमी झोप आणि स्क्रीनवर जास्त वेळ घालवल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर डार्क सर्कलची समस्या सुरू होते. पण या घरगुती उपायांनी तुम्ही तुमची काळी वर्तुळे कमी करू शकता.
 
1. ग्रीन टी बॅग :  सर्वात आधी पाण्यात ग्रीन टी बॅग डिफ्यूज़ करा नंतर आपण टी बॅग फ्रिजमध्ये गार होण्यासाठी ठेवून द्या. 10-15 मिनिटानंतर आपण थंड ग्रीन टी बॅग आपल्या डोळ्यांवर 5-10 मिनिटांसाठी ठेवा. याने डोळ्यांवरील पफीनेस कमी होईल आणि डार्क सर्कल्स देखील हळू-हळू कमी होऊ लागतील.
 
2. काकडी :  आपण पार्लरमध्ये अनेकदा डोळ्यांवर काकडी वापरताना पाहिलं असेल. काकडीत व्हिटॅमिन के भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे तुमच्या डोळ्यांतील काळ्या वर्तुळांची समस्या कमी होते. तुम्ही काकडीचे तुकडे घेऊन डोळ्यांवर ठेवू शकता.
 
3. बीटरूटचे सेवन :  आपण बीटरूटचे सेवन करावे. अधिक चांगले परिणाम हवे असल्यास आपण बीटरुट जेवताना न खाता जेवण्यापूर्वी खावे.
 
4. बटाट्याचा रस :   बटाट्यात अँटीऑक्सीडेंट असल्यामुळे हे आपल्या डार्क सर्कल आणि कोणत्याही डार्क स्पॉटला हलकं करण्यासाठी मदत करतं. आपण कच्च्या बटाट्याचा रस आपल्या चेहर्‍यावर 10-15 मिनिटांसाठी लावून चेहरा सामान्य पाण्याने धुऊन घ्यावा. असे दररोज केल्याने डार्क सर्कल्स हळू-हळू कमी होऊ लागतील.
 
5. बदाम तेल :  बदाम तेलात व्हिटॅमिन E आढळतं, ज्याने आपल्या डोळ्यांच्या खालील त्वचा हायड्रेट राहील आणि डार्क सर्कल्स कमी होतील. तुम्ही ऑर्गेनिक बदामाचे तेल घ्या आणि डोळ्याखाली लावा. 3-5 मिनिटे मसाज करा. रात्रभर लावूनही झोपू शकता.