मंगळवार, 12 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: शुक्रवार, 8 जानेवारी 2021 (11:17 IST)

वया पेक्षा 10 वर्ष लहान दिसण्यासाठी या 5 टिप्स अवलंबवा

प्रत्येक स्त्री तरुण, तेजस्वी आणि डागरहित त्वचा असण्याचे स्वप्न बघते. पण सध्याचे वातावरण प्रदूषित हवा आणि सूर्याच्या हानिकारक यूव्ही किरण या सारख्या समस्यांना दररोज सामोरी जावं लागतं, हे आपल्या चेहऱ्यावरील नैसर्गिक चमक कमी करतो या मुळे चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागतात. 

अशे बरेच सॅलून आहे जी अँटी एजिंग स्किन ट्रीटमेंट देतात. पण ते उपचार पूर्ण पणे काम करत नाही. या शिवाय त्या उत्पादकां मध्ये हानिकारक रसायने देखील असतात. जे आपल्या त्वचेला खराब करतात.
अशा परिस्थितीत प्रश्न असा येतो की स्वच्छ आणि नितळ त्वचा मिळविण्यासाठी सर्वात चांगला उपाय काय आहे? तर काळजी नसावी आम्ही घेऊन आलो आहोत 5 असे सोपे उपाय जे आपल्या त्वचेला तरुण ठेवण्यात मदद करतात आणि ह्याचा वापर नियमितपणे केल्याने आपण वयापेक्षा 10 वर्ष लहान दिसाल.
 
1 त्वचे ला टाईट करतं गुलाबपाणी- 
घट्ट आणि चमकदार त्वचेसाठी थोडंसं गुलाब पाणी आपल्या चेहऱ्याला डीप क्लीन्झरच्या रूपात काम करतो, हे आपल्या त्वचेच्या बंद छिद्रांना असलेली घाण आणि धूळ स्वच्छ करतो. या शिवाय गुलाबपाणी आपल्या डोळ्या खालील सूज कमी करण्यासाठी मदत करतो ज्यामुळे आपला चेहरा निस्तेज दिसतो.
* वापरण्याची पद्धत -
एका भांड्यात 2 लहान चमचे गुलाब पाणी, ग्लिसरीनच्या काही थेंबा आणि 1 /2 लहान चमचा लिंबाचा रस मिसळा. सर्व साहित्य चांगल्या प्रकारे मिसळा आणि कॉटन बॉल च्या साहाय्याने ही पेस्ट चेहऱ्यावर आणि मानेवर लावा. दररोज झोपण्यापूर्वी फक्त गुलाब पाणी लावल्याने देखील आश्चर्यकारक परिणाम मिळतात.
 
2 अंजिंगच्या लक्षणांना दूर करतो लिंबाचा रस -
लिंबू व्हिटॅमिन सी ने समृद्ध आहे. हे अँटी ऑक्सीडेन्ट देखील आहे हे आपल्या त्वचेसाठी चांगले असतात, हे आपल्या त्वचेसाठी अँटी-एजिंग उत्पादकाच्या रूपात काम करतो, जे वाढत्या वयातील सर्व लक्षणांना जसे की डाग, फाईन लाइन्स, आणि फ्रीकल्स दूर करतात. या शिवाय लिंबू त्वचेला ब्लीच करण्यात मदत करतो, हे चेहऱ्यावरील केसांना फिकट करतो, त्वचेला नैसर्गिकरित्या चमकदार बनवतो.
* वापरण्याची पद्दत - 
लिंबाचा रस काढून घ्या आणि ह्याला आपल्या चेहऱ्यावर आणि मानेवर लावा. हे 15 मिनिटे आपल्या चेहऱ्यावर ठेवा आणि नंतर चेहरा साध्या पाण्याने धुऊन घ्या. 

3 त्वचेला एक्सफॉलिएट करते काकडी आणि दही - 
ताजी आणि तरुण त्वचा मिळविण्यासाठी नियमितपणे त्वचेला एक्सफॉलिएट करण्याची गरज असते. दही आणि काकडी एकत्ररीत्या त्वचेला एक्सफॉलिएट करण्यासाठी आणि मृत पेशी काढण्यासाठी चांगल्या प्रकारे काम करत. दह्यात लॅक्टिक ऍसिड असत जे त्वचेला स्वच्छ करत आणि काकडी त्वचेला सुदींग करतो.
* वापरण्याची पद्धत - 
1/2 कप दही घ्या आणि 2 चमचे किसलेल्या काकडीसह चांगल्या प्रकारे मिसळून आपल्या त्वचेवर 20 मिनिटे लावा. नंतर कोमट पाण्याने चेहरा धुऊन घ्या. 
 
4 त्वचेला अधिक लवचीक बनवते पपई -
पपई सर्व फळां मध्ये एक आहे जे आपण निरोगी आणि चमकदार त्वचेसाठी वापरू शकता किंवा खाऊ शकता. या मध्ये व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात आढळत जे एका अँटी ऑक्सीडेन्ट प्रमाणे काम करतो आणि त्वचेला तरुण आणि निरोगी ठेवतो. पपईमध्ये एक असे एंझाइम आहे जे आपल्या त्वचेवरून मृत पेशी काढून टाकण्यासाठी मदत करत, ज्यामुळे त्वचा मऊ आणि गुळगुळीत होते.
* वापरण्याची पद्धत -
पपईचे तुकडे करून मॅश करून घ्या. ही पेस्ट संपूर्ण चेहऱ्यावर आणि मानेवर लावा आणि 15 मिनिटे असेच ठेवा. नंतर कोमट पाण्याने धुऊन घ्या. 
 
5 त्वचेला मॉइश्चराइझ करत नारळाचं दूध -
जेव्हा त्वचेला पुरेसा ओलावा मिळत नाही तर त्वचा निस्तेज आणि वृद्ध दिसू लागते. नारळाचं दूध हे त्वचेसाठी एक उत्तम मॉइश्चरायझर आहे. हे व्हिटॅमिन आणि खनिजांनी समृद्ध आहे, जे त्वचेला मऊ आणि निरोगी ठेवतो.
* वापरण्याची पद्धत -
कच्च्या नारळाला वाटून त्यामधून नैसर्गिक दूध काढता येत किंवा बाजारपेठेतून घेऊ शकतो. नारळाच्या दुधाला 20 मिनिटासाठी चेहऱ्यावर लावा नंतर गरम पाण्याने धुऊन घ्या.
 
आपण देखील हे उपाय करून बघा आणि त्वचेला तरुण बनवा. या मधील वापरल्या जाणाऱ्या सर्व वस्तू नैसर्गिक आहे त्यामुळे हे काही नुकसान देत नाही तरी पण प्रत्येकाची त्वचेची प्रकृती वेगवेगळी असते. हे वापरण्यापूर्वी हातावर पॅच लावून बघा.